सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगासनाला अनन्यसाधारण महत्व :प्रांताधिकारी सचिन इथापे
भारत विकास परिषद व श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायम संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम ,संतुलित आहार केल्याने शाररीक तंदुरुस्त राहता येते मात्र योगासने केल्याने शाररीक आणि मानसिक तंदुरुस्त राहता येते. त्यामुळे योगासंला अनन्यसाधारण महत्व आहे असे प्रतिपादन पंढरपुरचे प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे यांनी केले. तर श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्था व भारत विकास परिषद या संस्थेने हा स्तुत्य उपक्रम राबविले असून असेच समाजोपयोगी उपक्रम राबवावेत असे पालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी सांगितले.
पंढरपूर येथील भारत विकास परिषद आणि श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायम संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने योग भवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. विविध योग आणि त्याचे महत्व यावेळी सांगण्यात आले.
येथील श्री विठ्ठल रुक्मिणी योग संस्थेच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यां कार्यक्रमास प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव आणि दोन्ही स्वयंसेवी संस्थेची पदाधिकारी आणि सदस्य , नागरिक उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून आहार ,विहार आणि व्यायाम या अनुषंगाने विविध योगासने करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात वंदेमातरम ने झाली. त्या नंतर भारत विकास परिषदेचे अध्यक्ष मंदार लोहोकरे यांनी आपल्या प्रास्ताविक करताना भारत विकास परिषदेची स्थापना १९६३ साली झाली. संपर्क ,सहयोग,संस्कार, सेवा आणि समर्पण या पंच सूत्रीवर काम करीत आहेत. या आधी मतदान जन जागृती, रेल्वे विभागा मार्फत देशी वृक्षारोपण कार्यक्रम झाल्याचे त्यांनी सांगितले. त्या नंतर डॉ ज्योती गवळी ,डॉ अनिल पवार आणि अजित कुलकर्णी ( हे सर्व योगाचार्य आहेत ) यांनी उपस्थितीताना योगासने आणि माहिती दिली.
योग शिबिराची सुरवात प्रार्थनेने झाली. त्या नंतर सूक्ष्म व्यायाम,सुर्यनमस्कार ,वक्रासन,पश्चिमोत्तानासन,वज्रासन,हलासन ,सेतुबंधासन ,शलभासन, धनुरासन, भुजंगासन इत्यादी आसने आदी प्रात्यक्षिका सहित साधकांकडून करून घेण्यात आली. प्राणायाम सत्रात अनुलोम विलोम,भ्रामरी,ओंकार गुंजन घेण्यात आले. योग सत्राची सांगता ही शांती पाठाने झाली.दरम्यान, मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायम संस्थेचे अध्यक्ष अँड सुनील वाळूजकार यांनी आपल्या मनोगता मध्ये जागतिक योग दिनाचे महत्त्व सांगून 21 जून 2015 रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक योग दिनाची सुरुवात करण्यात आली पंढरपूर शहरातील सर्व स्तरातील नागरिकांच्या माध्यमातून स्वनिधी मधून भव्य योगभवन बांधले असून याठिकाणी शहरातील नागरिकांसाठी मोफत योग सराव वर्ग चालवला जातो तसेच या संस्थेच्या माध्यमातून अनेक आरोग्य शिवरे वृक्षारोपण व इतर सामाजिक उपक्रम राबवीत आहोत. या जागेत इनर व्हील क्लबच्या माध्यमातून ओपन जिम केले आहे तसेच या ठिकाणी खुल्या वातावरणात विविध कार्यक्रम व्हावेत म्हणून भव्य सांस्कृतिक भवन उभारले असल्याचे सांगितले. या वेळी श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेचे अध्यक्ष अँड. सुनिल वाळूजकर,सचिव प्रशांत आगावणे उपाध्यक्ष रवींद्र कोडग,अँड.रामलिंग कोष्टी, निस्सार शेख,आर बी जाधव, जयंत हरिदास, कांतीलाल सुपेकर तर भारत विकास परिषदेचे मंदार लोहोकरे, डॉ अनिल पवार, अजित कुलकर्णी ,डॉ सुरेंद्र काणे, डॉ वर्षा काणे, मिलिंद वाघ ,रोहिणी कोर्टीकर,सीमा कुलकर्णी, स्वानंदी काणे आदी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नीलम माळी यांनी केले तर आभार डॉ अनिल पवार यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.