मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी मी नक्कीच उमेदवारी अर्ज दाखल करणार:-माजी आमदार रमेश कदम
(मोहोळ मतदार संघातील राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी मी हि निवडणूक लढविणार:-माजी आमदार रमेश कदम)
(२७ तारखेच्या मेळाव्यातून पुढील भुमिका जाहीर करणार:-माजी आमदार रमेश कदम)
आमदारकीच्या काळात केवळ ०८ महिन्यात केलेल्या कामांचा ट्रेलर जनतेने पहिला आहे. त्यावरून येणारा पिक्चर कसा असेल याची कल्पना मोहोळकरांना आहे. त्यामुळे एक सांगतो नक्कीच चांगल्या व योग्य राजकीय पक्षाकडून उमेदवारी घेऊन कोणाला पाडायसाठी नव्हे तर निवडणूक जिंकण्यासाठी ही निवडणूक लढणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार रमेश कदम यांनी केले.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पूर्वतयारी साठी मोहोळ येथे आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आमदार रमेश कदम बोलत होते. यावेळी मनसेचे कैलास खडके, प्रताप शेळके, शाहूराजे देशमुख, दत्तात्रय पाटील, शंकर पवार, संग्राम डोंगरे, समाधान कांबळे, संभाजी मोटे, भाऊसाहेब चव्हाण, सुहास माने, शाखा मस्के, नेताजी कांबळे, अभजित राठोड,अविनाश भोसले, अमर माने, आप्पासाहेब शिरसाठ, गिरीधन कांबळे, तेजस आतकरे, प्रमोद खंदारे , शशिकांत कसबे, अण्णा कांबळे, संजय वाघमारे,विठ्ठल सरवदे, सुधीर खंदारे, सचिन भिसे, नागेश खिलारे, राजभाऊ अष्टुळ, वेदांत कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे आदी उपस्थित होते.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विकासाची ब्ल्यूप्रिंट
रमेश कदम म्हणाले की, माझा कार्यकर्ता हा अत्यंत सामान्य कार्यकर्ता आहे.तो प्रस्थापित नाही.मागील निवडणुकीत मी जेल मध्ये असताना जनतेने मला २५ हजार मते दिली होती. मोहोळची जनता ही खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारी आहे. येणारी निवडणूक मी तुमच्या सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवावर लढणार आहे. तुमची मेहनत व कष्ट वाया जाऊ देणार नाही. असे अभिवचन देतो. जसजसा हा प्रवास पुढे जाईल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या ट्रकवर चाललो आहोत. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विकासाची ब्ल्यूप्रिंट घेऊन जनतेसमोर जात ध्येयधोरणे मांडणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.
जाहिरातबाजीचे राजकारण कधीही केले नाही पुढे बोलताना कदम म्हणाले की, केवळ आठ महिन्याच्या कालावधीमध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या अनेक गावातील रस्ते, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता ही अभिनव संकल्पना राबवली. त्यावेळी जवळपास ३५० बोर मारल्या. जाहिरातबाजीचे राजकारण कधीही केले नाही. कोणत्याही नागरिकाचा पक्ष बघून त्याचे काम अडविले नाही. सर्व समावेशक भूमिका ठेवली. त्यावेळी केलेल्या कामाची जाणीव मोहोळ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील मतदारांनी ठेवली आहे. अशी भावना रमेश कदम यांनी बोलताना व्यक्त केली.
सिंघमची आजही क्रेझ कायम:
सिंघमची क्रेझ कायम: कार्यकर्त्यांचे मत
प्रारंभी प्रस्थापितांशी लढण्याची आमची तयारी आहे. कोणाची दमदाटी धमकी, दहशत याला आम्ही घाबरणार नाही. कारण आपल्या सोबत सिंघम आहे. त्यांची क्रेझ आज ही कायम आहे. रमेश कदम यांच्यासारखा आमदार असणे ही काळजी गरज आहे. तालुक्यातील अनेक विकासाचे प्रश्न अनेक अडचणी प्रलंबित आहेत. तरुण, शेतकरी, कामगार, युवक महिला, महाविद्यालयीन युवक यांच्या समस्या जानणारा नेता, कामाच्या जोरावर आपल्या मोहोळ चे नाव राज्यभरात गाजणारा नेता, मोहोळ च्या रस्त्यावर फळे, भाजी विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या जनतेला जागा मिळावी या साठी आंदोलन करून आपल्या अंगावर केस घेणारा नेता, मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता,सांगेल त्याची अडचण सोडविणार नेता, ॲक्शनला रिएक्शन देणारा नेता आहे. या नेत्याने तुतारी किंवा मशाल हाती घ्यावी अश्या भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्याची होत्या
२७ ऑक्टोबर ला मेळावा ; निवडणूक प्रचाराच्या तयारीला लागा
येणारी विधानसभा निवडणुक ही अत्यंत जोमाने , जोशाने लढायची आहे.अश्या छोट्या छोट्या बैठकीच्या माध्यमातून एका मोठ्या मेळाव्याची तयारी आपण करतो आहोत.२७ ऑक्टोबर रोजी ३० ते ३५ हजार लोकांचा मोठा मेळावा आपण मोहोळ मध्ये घेणार आहोत,या मेळाव्यापर्यंत आपण कोणत्या राजकीय पक्षात जाणार,कोणत्या चिन्हावर आपण निवडणूक लढणार,हे स्पष्ट होईल,आपण सर्वच माध्यमातून आजपासून निवडणूक प्रचाराच्या तयारीला आपण लागलो आहोत. असे समजून काम सुरू करा.
रमेश कदम, मा. आमदार