उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी सौ.आरती बसवंती यांचे पत्र!
(नीलमताई गो-हे यांची भेट घेत सौ आरती बसवंती यांनी केली त्यांच्याकडेही सविस्तर मागणी)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात होऊ घातलेल्या असताना माढा लोकसभा महिला जिल्हाप्रमुख पंढरपूर विभागाच्या सौ आरती ओंकार बसवंती यांनी शिवसेना महिला आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मागणी पत्र सादर केल्या असून यामध्ये त्यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे महिला राखीव सर्वसाधारण मधून निघाल्यामुळे मला या ठिकाणी पक्षाकडून संधी मिळावी व शिवसेना पक्षाची मी पंढरपूर नगरपरिषदेवर नगराध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी इच्छुक असल्याचे एक सविस्तर मागणी पत्र उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना दिले आहे..
काल मुंबई येथे सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिवसेनेच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकी वेळी खासदार श्रीकांत शिंदे साहेब व विधानभवनाच्या उपसभापती नीलम ताई गोरे याही उपस्थित होत्या.. यावेळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आढावा घेतला असता त्यांनी सर्व जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या… खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी यावेळी स्वतःहून आवर्जून सौ आरतीताई ओंकार बसंवती यांना पंढरपूर बाबत विचारणा फॉर्म भरावा असे सांगितले आहे.. त्यामुळे त्यांनी पूर्वतयारी सुरू केली असून.. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ते सर्व पंढरपूर शहरातील नागरिकांमध्ये लवकरच जाऊन गाठीभेटीचा कार्यक्रम करणार आहेत…
या पत्रामध्ये त्यांनी आवर्जुन आज पर्यंत केलेल्या सर्व सामाजिक कामांचा आढावा मांडला असून, पंढरपूर विभागामध्ये पक्ष वाढीसाठी युद्धपातळीवर काम केले असून आपल्या पक्षाच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक योजना राबविणे ( लाडकी बहीण योजना) ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना राबविणे याचबरोबर गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिबीर राबविणे, गोरगरीब जनतेच्या विवाहासाठी आर्थिक मदत करणे याचबरोबर पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी ही मूलभूत असे प्रयत्न सौ.. आरती ओंकार बसवंती यांनी केले आहेत…
पंढरपूर हे तिथक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी येत असतात पण येथील विकास म्हणावा तसा झालेला नसून कोट्यावधी रुपये निधी येऊन सुद्धा येथे काही विकास कामे झालेली नाहीत ती विकास कामे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून करण्यासाठी सौ आरतीताई ओंकार बसवंती ह्या प्रयत्नशील आहेत…

