सांगोला मतदार संघातील समस्त मातंग समाजाच्या, स्मृती भवन बांधकामासाठी एक कोटी रुपये मंजूर केल्याबाबत
सकल मातंग समाजाच्या वतीने शुक्रवारी आ.शहाजीबापूंचा भव्य सत्कार समारंभ!
सांगोला शहरात मातंग समाज स्मृतीभवन बांधण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला विधानसभा मतदारसंघातील सकल मातंग समाजाच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता. सदानंद मल्टीपर्पज हॉल, मिरज रोड, सांगोला या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेल्या पाच वर्षात सुमारे पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून तालुक्यातील विकासकामांना चालना दिली आहे. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच इतर विकास कामांना निधी उपलब्ध करून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच सर्वच समाजासाठी सभागृह, समाजमंदिर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी मातंग समाजासाठी सांगोला शहरातील नगरपालिका जागेत स्मृतिभवन बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निमित्ताने सकल मातंग समाजाच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात
लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आरक्षण वर्गीकरणाचे जनक विष्णूभाऊ कसबे, विधानपरिषदेचे नूतन सदस्य आमदार अमित गोरखे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनवणे यांचा विशेष सत्कार सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता. सदानंद मल्टीपर्पज हॉल, मिरज रोड, सांगोला या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांसाठी स्नेह भोजन देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सांगोला शहर व तालुक्यातील सर्व मातंग समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.