गोपाळपूर येथील आज रोजी झालेली ग्रामसभा ठरली प्रचंड गदारोळात संपन्न!
(गोपाळपूर येथील ग्रामसेवक मॅडम गैरहजर असल्यामुळे, विशेष ग्रामसभा घेण्याची ग्रामस्थांची प्रामुख्याने मागणी)
(अमोल पाटील व सतीश लेंगरे यांनी केलेल्या मागणीला सरपंचांनी दिली या ग्रामसभेत मान्यता!)
(यंग जनरेशनने पंढरपूर तालुक्यातील व गोपाळपुर येथील ग्रामसभा गाजवली संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गोपाळपूर येथील, ग्रामसभेमध्ये आज प्रचंड प्रमाणामध्ये वादळी चर्चा झाली असून, यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजने,तील घरकुल गायरान, व गावरान जमिनी,वरील घरे पाणीपुरवठा जलस्वराज्य मिशन स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्न ग्रामस्थांना न मिळणारे स्वस्त धान्य दुकानातील धान्य याचबरोबर, अतिक्रमणे, गावातील कचरा व्यवस्थापन, तसेच गावामध्ये होणाऱ्या स्मार्ट इलेक्ट्रिक मीटरची, ग्रामस्थांना होणारी सक्ती याचबरोबर अनेक मूलभूत व प्रमुख प्रश्नांची मांडणी या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली! त्याचबरोबर या ग्रामपंचायतीमध्ये प्रामुख्याने अनेक प्रश्नांची उकल सर्व नवयुवक तरुणांनी केल्यामुळे सरपंच व प्रशासनाला या ग्रामसभेमध्ये उत्तरे देणे भाग पडले! गोपाळपूर हे पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या एकदम जवळचे ठिकाण व श्री क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी दररोज लाखो भाविक गोपाळ कृष्णाच्या व शेजारील आसपासच्या मंदिरांना दर्शनासाठी येत असतात! ग्राम सभेमध्ये प्रामुख्याने गावाची विस्तार वाढ घनकचरा व्यवस्थापन व घरकुल बांधणी चे प्रश्न प्रामुख्याने ऐरणीवर आल्याचे दिसून आले! सर्वच नवतरुण ग्रामस्थांनी यामध्ये पुढाकार घेऊन, आमचे खूप मोठे प्रश्न प्रलंबित असून तुम्ही या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी या ग्रामसभेमध्ये करण्यात आली! ही ग्रामसभा वादळी ठरली असून लवकरच ग्रामसेवकांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा ग्रामसभा घेण्याचे आश्वासन गावातील सरपंचांनी व ज्येष्ठ नेते मंडळींनी दिल्यामुळे ही ग्रामसभाज आटोपती घेण्यात आली! जवळजवळ या ग्रामसभेमध्ये १५ ते १६ ठराव मांडण्यात आले असून याची प्रोसिडिंग ही करण्यात आलेली आहे ही ग्रामसभा व गोपाळपूर येथील ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये प्रामुख्याने घेण्यात आली!
