*सोलापूर जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून प. कुरोली पंचायत समिती सदस्य सौ. प्रमिला सोमनाथ झांबरे यांच्याकडून गणातील शेतकऱ्यांना वैरण व बी बियाणे मोफत वाटप!*
*(९५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या योजनेचा लाभ सौ झांबरे यांनी केली सर्व शेतकऱ्यांना मदत)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
सोलापूर जिल्हा परिषद,सेस फंडातून पशुसंवर्धन विभाग यांच्या मार्फत शेतकऱ्यांना मोफत वैरण बियाणे मिळणार आहेत, माढा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पटवर्धन कुरोली गणातील पंचायत समिती सदस्या सौ प्रमिला सोमनाथ झांबरे यांनी गणातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालयमध्ये जाऊन आव्हे-तरटगाव, पटवर्धन कुरोली -उजनी वसाहत, पिराची कुरोली -चिंचणी,वाडीकुरोली,शेळवे,देवडे या सर्व गावांमध्ये मोफत वैरण बियाणे फॉर्म भरून घेतले, पटवर्धन कुरोली गणातील शेतकऱ्यांनी ९५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी फॉर्म भरून दिले, पशुसंवर्धन विभाग अधिकारी यांच्या कडे फॉर्म जमा करण्यात आले असून आठ दिवसा मध्ये बियाणे येणार असून पटवर्धन कुरोली गणातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
