
जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्या शुभहस्ते चिंचोली एमआयडीसी मोहोळ येथील स्वरूप एंटरप्राइजेस चा शुभारंभ संपन्न!
(आ. सचिन दादा कल्याण शेट्टी व भाजप नेते शहाजी पवार यांची या कार्यक्रमास विशेष हजेरी)
मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्वरूप एंटरप्राइजेस या फार्मासिटिकल केमिकल युनिटचा शुभारंभ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी व भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी भाऊ पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला!
मोहोळ तालुक्यातील नवतरुण युवकांनी सुरू केलेला हा प्रकल्प उद्योग व रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून अधोरेखित करणारा असून या अशा नवीन प्रकल्पामुळे मोहोळ तालुक्यातील स्थानिक अर्थव्यवस्थेला अधिकाधिक चालना मिळणार आहे त्याचबरोबर असे नवनवीन प्रकल्प मोहोळ तालुक्यात आगामी काळात उभे राहू शकतात यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.. या कार्यक्रमास अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष राजेंद्र गुंड-पाटील, त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील अनेक नेते मंडळी व स्वरूप एंटरप्राइजेस चे सर्व सहकारी मित्रपरिवार मोठ्या संख्येने या शुभेच्छा देण्यासाठी हजर होते..
कोट
मोहोळ तालुक्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी व येथील रोजगाराला चालना देण्यासाठी चिंचोली एमआयडीसी व मोहोळ येथे अनेक नवनवीन प्रकल्प व व्यवसाय उभे करून सर्व नवयुवकांना रोजगार मिळावा यासाठी मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करून असे अनेक नवीन प्रकल्प मोहोळ तालुक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
उमेशदादा पाटील
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
