वडवळ येथील जागृत असलेल्या श्री नागनाथ देवस्थानास ४ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर: सुनील चव्हाण
(पर्यटन विकास आराखडा अंतर्गत श्री नागनाथ देवस्थान सुशोभीकरण आणि परिसरात विविध कामे होणार)
सोलापूर जिल्हा पर्यटन विकास आराखडा अंतर्गत वडवळ (ता.) मोहोळ येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री नागनाथ देवस्थान सुधारणा, आणि परिसरात विविध प्रकारच्या कामासाठी ४ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मोहोळ तालुका भाजपाचे अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन विकास समितीचे सदस्य सुनील चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिले दिली याबाबत श्री चव्हाण यांनी गेले यासाठी वर्षभर सातत्याने जिल्हा व राज्य स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला होता. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील उजनी पर्यटन जल,कृषी धार्मिक आणि निसर्ग पर्यटनासाठी सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकासाच्या आराखडा अंतर्गत २८२ कोटी रुपयांचा प्रस्तावित आराखडा केला तयार केला होता.
त्यामध्ये भाजपचे मोहोळ तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांनी वडवळ नागनाथ देवस्थान साठी ४ कोटी निधी देण्याची मागणी केली होती. या प्रस्तावाचे फाईल जिल्हास्तरीय समितीच्या समोर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादर केली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यास मंजुरी देऊन राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे ती फाईल पाठवण्यात आली होती. त्याला राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या वतीने मान्यता देण्यात आली.
त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ही फाईल सादर केली. त्याला पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी ही मान्यता दिली. त्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला अंतिम मंजुरी दिली.
यामुळे जागृत देवस्थान असलेल्या वडवळ नागनाथ देवस्थान विकासासाठी४ कोटी रुपयांचा निधी मिळण्याची खात्री झाली आहे. हा निधी मिळावा यासाठी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपुजे यांनी वारंवार माजी पालकमंत्री नामदार विजयकुमार देशमुख राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे वेळोवेळी तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या मार्फत आणि मदतीने पाठपुरावा केला होता*. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अखेर याला मान्यता मिळाली. या निधीमधून प्राधान्याने खर्गतीर्थ परिसर सुधारणा, मंदिरासमोर दर्शन मंडप उभारणी, श्री गोपाळ कृष्ण मंदिर आणि नरसिंह मंदिर परिसर सुधारणा आणि निवारा शेड, वडाचे झाड आणि मुंगीचा धोंडा जवळ संरक्षक भिंत बांधकाम, भक्तनिवास परिसर सुधारणा, पेव्हर ब्लॉक्स बसविणे, पिण्याचे स्वच्छ पाणी, भूमिगत गटार सुलभ शौचालय आदी पायाभूत करण्यात येतील. यामुळे भाविकात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हा निधी मंजूर झाल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, पर्यटन मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री यांचे खासगी सचिव बाळासाहेब यादव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.सचिन कल्याण शेट्टी खासदार धनंजय महाडिक,जिल्हा नियोजन अधिकारी दिलिप पवार आणि सहायक नियोजन आधिकारी कुंडलिक गोडसे, तालुकाध्यक्ष तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण आणि श्रीकांत शिवपुजे यांचे भाविक भक्त मधून अभिनंदन करण्यात येत आहे.