विद्यामंदिर हायस्कूल,एखतपूर मध्ये 1995-1996 च्या बॅचचा स्नेह मेळावा संपन्न
विद्यामंदिर हायस्कूल एखतपूर मध्ये 1995-1996 च्या बॅचचा गेट-टुगेदर संपन्न झाला. शनिवार 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी १० वाजता दीप प्रज्वलानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष नवले यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष कृषी भूषण प्रभाकर काका चांदणे यांचे स्वागत आणि सत्कार मेजर सोमनाथ भोसले या विद्यार्थ्यांनी केले.
यावेळेस प्रशालेचे माजी मुख्याध्यापक येलपले सर, डोंबे सर, मेटकरी सर, चव्हाण सर, दिघे सर, प्रशालेचे विद्यमान मुख्याध्यापक कांबळे सर व जितेश कोळी सर यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले. या वेळी सर्व शिक्षकांना श्री संत दामाजी पंत यांची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आठवणीतील चांगल्या वाईट प्रसंगाच्या मनमोकळ्या गप्पा झाल्या.
आपल्या प्रस्ताविक पर भाषणात संतोष नवले यांनी सांगितले की या शाळेने आम्हाला शिक्षणाबरोबर जीवन कसे जगायचे व जीवनाच्या संघर्षाला कसे सामोरे जायचे हे शिकवले. त्याचप्रमाणे दत्ता कबाडे, पांडू बुरुमले, सोमनाथ भोसले, राधिका नलवडे, संतोष आसबे यांनी आपले विचार प्रकट केले. त्याचप्रमाणे उपस्थित शिक्षकांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे कृषीभूषण प्रभाकर काका चांदणे यांनी “विद्यार्थ्यांचे असे गेट-टुगेदर वारंवार घ्यावेत ही शाळा त्यांचीच आहे” असे उद्गार काढले. त्याचप्रमाणे समाजामध्ये सध्या उद्भवणाऱ्या परिस्थितीवरती व प्रगतशील शेती संदर्भात आपले विचार मांडले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात म्हणून एक प्रोजेक्टर गिफ्ट दिला. उपस्थित विद्यार्थ्यांनी ग्रुप फोटो,शिक्षकांसोबत फोटोंचा, सेल्फी पॉईंटचा आनंद मनोमन लुटला. दुपारच्या सत्रामध्ये मुलींसाठी खेळ पैठणीचा हा संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यामध्ये विद्या बनकर उपविजेती व सुवर्णा इंगोले विजेती ठरली. त्याचप्रमाणे मुलांच्या ग्रुप मध्ये पोपट गोरे उपविजेता व सिद्धेश्वर इंगोले विजेते ठरले.
कार्यक्रमासाठी खालील विद्यार्थी उपस्थित होते:
विद्यार्थी: सोमनाथ भोसले, दत्तात्रय कबाडे, हनुमंत यमगर, युवराज आळसूनकर, पांडुरंग बुरुंगले, संतोष आसबे, पोपट गोरे, सोमनाथ नवले, नागनाथ देशमुख, शिवाजी कबाडे, विजय म्हेत्रे, संतोष नवले, धनाजी जाधव, सिद्धेश्वर इंगोले, विशाल तोरणमल, नवनाथ नवले, महादेव मोरे, अनिल इंगोले, सुधीर गोडसे, विजय मोरे, तानाजी शेंबडे, धनंजय इंगोले, प्रताप इंगोले, सोमनाथ इंगोले, लक्ष्मण हजारे, गोरख हजारे, चालेकर
विद्यार्थिनी: रहिसा काझी राधिका नलवडे, विमल नवले, राणी उबाळे, सुरेखा बिले, सुवर्णा इंगोले, वंदना म्हेत्रे, शालन म्हेत्रे
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय म्हेत्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगत हॉटेल जयनीला येथे स्नेह भोजनाने व विशाल तोरणमल यांच्या वाढदिवस साजरा करून झाली.
