अंतरवाली सराटी येथे चेअरमन अभिजीत पाटलांनी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला दिली भेट
(सरकारने तात्काळ मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्याचे अभिजीत पाटील यांनी केले अवाहन)
गरजवंत मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे आता तरी सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा. असे आवाहन विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.
मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरू केले आहे. त्या ठिकाणी आज दि.२० सप्टेंबर रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली.
अंतरवाली सराठी येथे भेटी दरम्यान औदुंबर महाडिक-देशमुख, आबासाहेब साठे, ऋषिकेश तांबिले, वाय.जी. भोसले, रणजित भोसले, जनक भोसले, पंकज लामकाने, अनिल यादव, कुलदीप कोलगे, शहाजी मुळे, दादासाहेब शिंदे, दिंगबर खडके, दादा पाटील, राज लोंढे, सचिन पाटील, महेश खटके, अतुल गायकवाड, सुनिल भोसले, कालिदास साळुंखे, सरपंच सोमानाथ झांबरे, विकास पाटील, नवनाथ नाईकनवरे, गोपाळ पाटील यासह आदी उपस्थित होते..
चौकट:
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला भेट दिली असता त्यांची तब्येत खालावली असून बोलायला, बसायला सुध्दा त्राण उरला नाही..मनं सुन्न झालं! मराठा समाजाच्या लेकरांच भलं व्हावं म्हणून तडफडणारा जीव बघितला. मनोजदादा आपण काळजी घ्या; आपली समाजाला गरज आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि समाजाला न्याय द्यावा..हि कळकळीची विनंती अभिजीत पाटील यांनी केली.