आ.शहाजीबापूंच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचा ५८ वा वर्धापनदिन साजरा
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली संघटना म्हणजे शिवसेना. १९ जून १९६६ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. सांगोला येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचा ५८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेल्या शिवसेना छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. बुधवार १९ जून रोजी ५८ व्या वर्धापनदिनी सांगोल्यात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवसेनेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आज वर्धापनदिन साजरा होत असतानाच राज्यात शिवसेनेचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुशल नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारे कारभार सुरू आहे. त्यामुळे वेगळाच आनंद व्यक्त होत आहे. सोशल मिडियावर देखील शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या आजवरच्या आठवणींना शिवसैनिकांनी उजाळा दिला. तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी युवासेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, उद्योजक बाळासाहेब आसबे, विद्यार्थी संघटनेचे तालुकाप्रमुख अजिंक्य शिंदे, प्रितिश दिघे यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.