आ.समाधान आवताडे यांना मिळाले प्रमोशन!
(विधानसभेच्या तालुकाध्यक्षपदी समाधान दादांची नियुक्ती)
(पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा)
पंढरपूर-मंगळवेढ्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवताडे यांना प्रमोशन मिळाले असून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी समाधान आवताडे यांची वर्णी लागली आहे.
प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेल्या आवताडे यांच्यासाठी ती मोठी संधी मानली जात आहे. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे.
विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात ही जनगण आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताने झाली. त्यानंतर विधानसभा ॲड राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षांची तालिका अध्यक्ष म्हणून पाच जणांची निवड जाहीर केली आहे.
विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून भाजपकडून दोघांना संधी देण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या एका आमदाराची वर्णी लावण्यात आली आहे.
तालिका अध्यक्ष म्हणून भाजपकडून आमदार कालिदास कोळंबकर, समाधान आवताडे, शिवसेना शिंदे गटाकडून संजय शिरसाट, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून किरण लहामटे आणि काँग्रेसकडून अमिन पटेल या पाच आमदारांची निवड तालिकाध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.
समाधान आवताडे हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव केला होता.
मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मिळाले होते, त्यामुळे समाधान आवताडे आणि त्यांचा मतदारसंघ चर्चेत होता.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपकडून त्यांना बढती मिळाली असून विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदावर संधी देण्यात आली आहे.
समाधान आवताडे यांच्या अगोदर या मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांनी तालिका अध्यक्ष म्हणून काम केले आहे, त्यामुळे प्रथमच आमदार झालेल्या आवताडे यांच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे.