आ. शहाजी बापू पाटील यांचे पुतणे सागर दादा पाटील यांची घेरडी येथील विविध गणेश तरुण मंडळास सदिच्छा भेट..
घेरडी या गावची ओळख सांगोला, मंगळवेढा, जत . या तीन तालुक्याच्या मध्यभागी असणारे व अप्रुपा नदीच्या किनारी असणारे गाव आहेः.
या गावात विविध जयंती उत्सव अगदी चांगल्या प्रकारे साजरी होतात त्याच प्रमाणे गणपती उत्सव सुद्धा चांगल्या प्रकारे विविध संस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी केली जातात . काही मंडळे 50 वर्षांहून अधिक काळ गणपती उत्सव सुद्धा चांगल्या प्रकारे साजरी करतात.
याही वर्षी चांगल्या प्रकारे साजरी करण्यासाठी आमदर शहाजी बापू पाटील यांचे पुतणे सागर दादा पाटील यांना घेरडी येथील शिवप्रेमी गणेश तरुण मंडळ, गोल्डन गणेश तरुण मंडळ, जय अहिल्या गणेश तरुण मंडळ, श्रीशैल्य तरूण गानेश मंडळ, अरुणोदय गणेश तरुण मंडळ, साईनाथ तरूण गणेश मंडळ या मंडळांनी त्यांना श्री. आरती साठी आमंत्रित केलं त्यांच्या विनंती ला मान देऊन ते उपस्थित राहिले.
घेरडी गावातील शिवप्रेमी गणेश तरुण मंडळ यांनी आतापर्यंत घेतलेल्या विविध संस्कृतिक कार्यक्रमांची माहिती घेतली या मंडळाने समाज प्रबोधन देखावे सादर केले होते, शेतकऱ्यांशी संवाद साधला जावा म्हणून नारळाची झाडे वाटप केली. मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून वक्तृत्व स्पर्धा, संगीत खर्ची, प्रश्न मंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे अनेक संस्कृतिक व सामजिक कार्यक्रम या मंडळाने घेतले, तसेच गोल्डन गणेश तरुण मंडळाने महिलांना कला गुणांना वाव मिळावा म्हणून महिलांसाठी हळदीकुंकू, व होम मिनिस्टर , महिलांची संगीत खुर्ची,, महाप्रसाद म्हणून दरवर्षी गावांसाठी भोजन व्यवस्था केली जाते अशे कर्यकर घेतले जातात, जय अहिल्या गणेश तरुण मंडळ नेहमी अन्न दान है श्रेष्ठ दान म्हणून गावासाठी प्रसाद म्हणून जेवणाचे नियोजन करते तर मंडळातील सर्व सभासदांना दिवाळी निमीत्त मंडळातील सर्व सभासदांना दिवाळी साहित्य वाटप है मंडळ करते. एवढेच नव्हे तर सदया घेरडी येथील मायाक्का मंदिर हि त्यांनी तयार केले आहे असे अनेक वर्षांपासून है मंडळे प्रेतेक वर्षी चांगल्या प्रकारे विविध संस्कृतिक कार्यक्रमांची आखणी करून ते गणेश मंडळ उपक्रम राबवितात.
है मंडळांचे उपक्रम एकून आमदार शहाजी बापू पाटील यांचे पुतणे सागर दादा पाटील है या गावात येणे माझे सार्थक झले अशे उपक्रम वेळोवेळी राबवावेत अशी अपेक्षा हि त्यांनी व्यक्त केली माझ्या परीने अशा मंडळास जे काही गरज लागेल ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो असे मत व्यक्त केले.
या प्रसगी माजी सरपंच दिलीप मोटे, माजी सभापती कृषी व पशसंवर्धन जिल्हा परिषद सोलापूर अनिल मोटे, घेरडी ग्रामपंचात सदस्य , व मायाक्का देवी महिला अर्बन को ऑप. क्रेडिट सोसयटी चें चेरमन श्रीनिवास करे, शिवप्रेमी गणेश मंडळाचे मार्गदर्शक, व सामजिक व राजकीय अनुभव असणारे नेते संजय पोळ, ट्सेच शिवप्रेमी गणेश तरुण मंडळ, गोल्डन गणेश तरुण मंडळ, व जय अहिल्या गणेश तरुण मंडळ अरुणोदय गणेश तरुण मंडळ, श्रीशैल्य तरूण गणेश मंडळ साईनाथ गणेश तरुण मंडळ यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व मंडळाचे मार्गदर्शक, सभासद हजर होते.