विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे पिंपळनेर युनिटचे विक्रमी 24 लाख टन ऊस गाळप-आ.बबनराव शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथील सन 2021-22 गळीत हंगामामध्ये 5 मे,2022 अखेर 24 लाख 03 हजार 074 मे.टन विक्रमी ऊस गाळप झाले असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथील सन 2021-22 गाळप हंगाम सुरू असून या हंगामामध्ये यापूर्वीच 20 लाख मे.टन गाळप करून सन 2017-18 मध्ये प्रस्थापित केलेला गाळपाचा विक्रम मोडीत काढलेला आहे. तसेच 5 मे,2022 अखेर 24 लाख 03 हजार 074 मे.टन विक्रमी ऊस गाळप एक नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यामध्ये देशात उच्चांकी ऊस गाळपाचा विक्रम प्रस्थापित करण्याकडे कारखान्याने वाटचाल सुरू केलेली आहे. या हंगामात 25 एप्रिल अखेर अनुदानासह प्रति टन 2300 प्रमाणे ऊस बिल व 15 एप्रिल अखेर ऊस तोडणी वाहतूक बील ‌अदा करण्यात आलेले आहे युनिट नं.1 पिंपळनेर येथील सन 2021-22 गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांचे नोंदलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही अशी माहीती संस्थापक-चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here