(नरकचतुर्दशी लक्ष्मीपूजन निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान)
(नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर (ता.०७) वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. आज नरकचतुर्दशी लक्ष्मीपूजन निमित्त पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
*श्री विठ्ठलास* सोन्याचे मुकुट, हिरा नाम, कौस्तुभ मनी, दंडपेठ्या जोड, हिऱ्याचे कंगन जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, शिरपेच मोठा, शिरपेच लहान, मोठी बोरमाळ, हायकोल, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, तोडे जोड, मत्स्य जोड इ. अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
*श्री रुक्मिणी मातेस* सोन्याचे मुकुट, जडावाचा हार, नवरत्नाचा हार, खड्यांची वेणी, पाचूची गरसोळी, चिंचपेटी हिरवी, हातसर जोड, पानाड्याचा हार, ठुशी, मास पट्टा, जडावाचे ताणवट जोड, चंद्र, सूर्य, बाजीराव गरसोळी, पेठयांची बिंदी, खाड्यांच्या पाटल्या, सोन्याचे बाजूबंद, मत्स्य, रूळ जोड, पैंजण जोड, मोठी नथ, कर्णफुले, सोन्याचा करंडा, तोडे जोड, तारामंडळ, दशावतारीहार इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
*राधिका मातेस* सिद्धेश्वर टॉप लक्ष्मीहार पुतळ्यांची माळ ठुशी व *सत्यभामा मातेस* नक्षी टोप ठुशी पुतळ्यांची माळ, जवमनी पदक इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
*महालक्ष्मी मातेस* सोन्याचे गंठण, लफ्फा, दंडपेट्या जोड, झनक झनक हार, तांदळा हार, सूर्यकळी हार, चंद्रहार, शिरपेच, मोत्याची कंठी, लक्ष्मी पदक लॉकेट, चांदीची छत्री व *श्री. व्यंकटेशास* जवेची माळ, मारवाडी पेट्यांचाहार, इमिटेशन नेकलेस, मोहन माळ, कोयरीहार, तुळशी माळ इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पारंपरिक अलंकाराच्या वेशातील मनमोहक रूप पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी श्री.श्रीकांत यादव यांनी सांगितले.
