दिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या अन्नछत्रास किराणा साहित्याची देणगी
(नांदेड येथील श्री. अर्जुन हनुमंत पिंगळे यांचा सेवाभावी उपक्रम; सुमारे ९१ हजार रुपयांचे किराणा साहित्य अर्पण)
दिपावली २०२६ मधील लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या अन्नछत्रासाठी नांदेड येथील भाविक श्री. अर्जुन हनुमंत पिंगळे यांनी सुमारे रुपये ९१,०००/- मूल्याचे किराणा साहित्य देणगी स्वरूपात अर्पण केले.
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना अन्नछत्राच्या माध्यमातून भोजनप्रसाद उपलब्ध करून देण्याचे कार्य मंदिर समितीमार्फत केले जाते. या सेवाभावी उपक्रमास हातभार लावण्याच्या उद्देशाने श्री. पिंगळे यांनी दिवाळीच्या मंगलमय पर्वावर किराणा साहित्याची देणगी दिली. सणासुदीच्या काळात अन्नदानासारख्या पवित्र सेवेसाठी दिलेल्या या योगदानामुळे अन्नछत्राच्या कार्यास निश्चितच मदत होणार आहे. मंदिर समितीच्या वतीने श्री. अर्जुन हनुमंत पिंगळे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
