*चंद्रभागा नदीपात्रात फेकले मांसाचे अवशेष सीसीटीव्ही फुटेज तपासावे,पांडुरंग माने फाउंडेशन आक्रमक!*
*(वारंवार होत असलेल्या अशा कृत्यामुळे, चंद्रभागा नदीचे पावित्र्य नष्ट होत आहे:- निलेश पांडुरंग माने)*
पंढरपूर येथे चंद्रभागा नदीपात्रात नुकतेच पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, शहरातील नव्या पुलाच्या उंच दगडी कठड्यावरून अज्ञाताने कोंबडीचे पंख, मांसाचे तुकडे आणि रक्ताने माखलेले अवशेष थेट नदीपात्रात फेकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वारकऱ्यांची मोठी श्रद्धा असलेल्या चंद्रभागेची विटंबना झाल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हा प्रकार निदर्शनास येताच पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. या निंदनीय कृत्याला जबाबदार असणाऱ्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी फाउंडेशनने प्रशासनाकडे केली आहे. सीसीटीव्हीत संबंधित व्यक्ती
प्रमुख मागण्या
*नव्या पुलावरील सीसीटीव्ही फुटेज तात्काळ तपासावे*
*कृत्य करणाऱ्या आरोपींची ओळख पटवावी*
*संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी*
*भविष्यात असा प्रकार रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी!*.
*आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही फाउंडेशनकडून देण्यात आला आहे.*
