- *पटवर्धनकुरोली प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पीक पाहणी!*
*(सर्व शेतकऱ्यांकडे पीक पाहणी सातबारा असणे अत्यंत आवश्यक आहे:-ग्राम महसूल अधिकारी श्री प्रकाश भिंगारे)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पटवर्धनकुरोली -DCS MH डाऊनलोड करून सर्व शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी तात्काळ करून घेण्यात यावी इथून पुढे सर्व शासकीय योजनेचा लाभ अनुदान यासाठी पीक पाणी सातबारा असणे फार महत्त्वाचे आहे संभाव्य दुष्काळी परिस्थिती असेल पिक विमा असेल पी एम किसान पेन्शन योजना असेल कृषी खात्याच्या काही योजना असतील यासाठी पीक पाणी आवश्यक आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ आपली पिक पाहणी करून घ्यावी काही अडचण आल्यास गावचे ग्राम महसूल अधिकारी सीएससी चालक नियुक्त सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा
यावेळी ग्राममहसूल अधिकारी श्री.प्रकाश भिंगारे,Cscचालक युवराज गोसावी,बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर, चेअरमन अनिल सावंत, हरीभाऊ उपासे,नागनाथ नाईकनवरे, गणेश जाधव,रेवन मोरे, संतोष नाईकनवरे,जिवन कोरके, नवनाथ नाईकनवरे सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते…
