*पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा संपन्न!*
*उच्चतम बाजार समितीमध्ये समावेश होणेसाठी प्रयत्नशील रहावे!..श्री. प्रशांतराव परिचारक*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. ९/९/२०२६ रोजी दुपारी २ वाजता बाजार समितीचे सभापती मा.श्री. हरिषदादा भास्करराव गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षते खाली व सोलापुर जिल्हयाचे आमदार मा.श्री. प्रशांतराव परिचारक साहेब, चेअरमन कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखाना लि., श्रीपुर यांचे प्रमुख उपस्थितीत बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झाली.
यावेळी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मा. श्री. प्रशांतराव परिचारक साहेब बोलताना म्हणाले की, बाजार समितीच्या माजी व सध्याचे सभापती यांनी चांगले प्रयत्न केल्यामुळे बाजार समितीचा कारभार चांगल्या पध्दतीने सुरू असुन उत्कृष्ठ वाटचाल सुरू आहे. मोठ्या मालकांच्या दुरदृष्टी प्रमाणे आज या बाजार समितीमध्ये ६६० कोटीची उलाढाल झालेली आहे. बाजार समितीची स्थापना ही शेतकरी बांधवांना न्याय मिळावा या हेतूने झालेली आहे. तसेच बाजार समितीने बाजार आवारात जास्तीत जास्त शेतीमाल विकी केल्याबद्दल शेतकरी यांचा सन्मान व जास्तीत जास्त शेतीमालाच्या विक्रीची उलाढाल करणारे व्यापारी यांचा सन्मान केल्याबद्दल शुभेच्छा देवून बाजार समितीचे कामकाजा बाबत कौतुक केले. तसेच शेतकऱ्यांच्या सोईसाठी नवीन काही करता येईल का ते पहावे. विकसीत महाराष्ट्र २०४७ व्यवसाय विकास आराखडा अंतर्गत अनुदानामधुन विविध विकास कामे करणे बाबत बाजार समितीने कृषि पणन मंडळाच्या वतीने अहवाल सादर केलेला आहे. बाजार समिती मार्फत व्यापार वाढीसाठी भविष्यात आनखीन सोयी सुविधा पुरविल्या जातील. नवीन प्रकल्प राबविले जातील. शेतकरी व व्यापा-यांच्या अडी-अडचणी सोडविल्या जातील असे सांगितले.
यावेळी बाजार समितीचे सभापती मा.श्री. हरिषदादा भास्करराव गायकवाड प्रास्ताविकामध्ये बोलताना बाजार समितीच्या कामकाजा बाबत सांगताना म्हणाले की कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मा.श्री. प्रशांतराव परिचारक मालकांच्या मार्गदर्शना खाली या बाजार समितीची वाटचाल चालु असुन वरचेवर बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. बाजार समितीमध्ये बेदाणा शेतीमालाची रु.५०१ कोटी, डाळींब रू.६० कोटी, फळे व भाजीपाला रू.४२ कोटी, भुसार धान्ये रू.२३ कोटी, कांदा रू.२३ कोटी, जनावरे रू.४ कोटी, केळी रू.६ कोटी, वैरण रू.१ कोटी अशी एकुण बाजार समितीची वार्षिक उलाढाल ६६० कोटी झालेली आहे. या उलाढाली मधुन रू.५.४८ कोटी उत्पन्न बाजार समितीस मिळालेले आहे. बाजार समितीने शॉपिंग सेंटर वाढीव गाळे, आडत व्यापारी गाळे, सौदे कामकाज करिता सेलहॉल, स्वच्छतागृहाची सोय, पिण्यांचे पाण्यासाठी आर.ओ. प्लॅन्ट, बाजार आवार वॉल कंपाउंड, ६० मे.टनी वजनकाटा इत्यादी विविध विकास कामे केलेली असुन बाजार आवारात सौर उर्जा प्रकल्प, सि.सी.टी.व्ही यंत्रणा बसविणेचे काम सुरू असुन फळे व भाजीपाला मार्केट साठीचे गाळे, डाळींब मार्केट करिता काँक्रीटीकरण करणे, कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक मालक यांचा पुतळा उभारणी करणे, रस्ते, शॉपिंग सेंटरचे वरील मजल्याचे बांधकाम, पेट्रोल पंप. इत्यादी कामे व इतर सोयी सुविधा करण्यांचा आमचा मानस आहे. सन २०२४-२५ चा उत्कृष्ठ बाजार समितीचा वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार या बाजार समितीस मिळाला. तसेच स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत बाजार समितीचा राज्यस्तरीय ५ वा कमांक, विभागातून २ रा क्रमांक तर जिल्हयातुन १ ला कमांक मिळालेला आहे. बाजार समितीचेआवारामध्ये फळे, भाजीपाला, कांदा, डाळींब, केळी, भुसार धान्ये, वेदाणा इत्यादी सौदे कामकाज चांगल्या प्रकारे चालु आहे.
बाजार समितीच्या बँकेतील गुंतवणुकी मध्ये वाढ झालेली आहे. तसेच आवश्यक विकासकामे पूर्ण करून व्यापार वाढीसाठी प्रयत्न करीत आहोत. असे सांगितले.
मान्यवरांचे सुरूवातीस बाजार समितीचे उपसभापती मा.श्री. राजुबापू विठ्ठलराव गावडे साहेब यांनी सर्वांचे स्वागत केले.
बाजार समितीने सुरू केलेल्या उपक्रमातून बाजार आवारात जास्तीत जास्त शेतीमाल विकी केल्याबद्दल शेतकरी श्री. विक्रमसिंह प्रल्हाद डोंगरे रा. आढेगाव ता. मोहोळ, श्री. प्रशांत भारत पाचफुले रा. यल्लमवाडी ता. मोहोळ, श्री. राजाराम शंकर भोसले रा. जाधववाडी ता. पंढरपूर. श्री. भारत शिवाजी बागल रा. गादेगाव ता. पंढरपूर, श्री. शंकर कदम रा. टेंभूर्णी ता. माढा, श्री. संकेत संजय बागल रा. जळोली ता. पंढरपूर. श्री. रामचंद्र महादेव शिंदे, रा. शेंडेचिंच ता. माळशिरस, श्री. जालींदर महादेव बनकर, रा. वेळापुर ता. माळशिरस श्री हनुमंत खंडेराव कदम रा.उघडेवाडी ता. माळशिरस, श्री. समाधान भारत कोळेकर रा. सोनके ता. पंढरपूर, श्री. संदिप पाटील रा. मेंढापुर ता. पंढरपूर श्री. चंद्रकांत महादेव लवटे रा. खर्डी ता. पंढरपूर, श्री. शिवाजी महादेव माळी रा.जळोली ता.पंढरपूर. श्री. कुंडलिक रामचंद्र घाडगे, श्री. प्रदिप विठ्ठल मोरे रा. चळे ता.पंढरपूर. यांचा व जास्तीत जास्त शेतीमाल विक्री केल्याबद्दल आडते तुलसी ट्रेडींग कंपनी प्रो. विनीत अशोक बाफना, मे. सदाशिव गणपत डोंबे प्रो. सोमनाथ सदाशिव डोंबे, श्रीहरी ट्रेडींग कंपनी प्रो. मुकुंद मर्दा, आशिष ट्रेडींग कंपनी प्रो. संजय प्रल्हाद मस्के, मे. अतिक शब्बीर बागवान, मे. खलील अहमद हिरालाल बागबान, श्री. धनंजय कोंडीबा गाडेकर, मालोजी बाळासाो शेंबडे, काळे अँड कंपनी श्री. मारूती हरी काळे, मे.सोहम ट्रेडींग कंपनी प्रो.अशोक बळीराम शिंदे, मे. संजय विष्णु नागणे, मे. रूक्मिणी-पांडुरंग ट्रेडॉग कंपनी प्रो. ओंकार भोसले, मे. सिध्दनाथ ट्रेडींग कंपनी श्री. सोमनाथ बलभिम सप्ताळ, श्री. मुजाहिद नजीर अहमद बागवान, मे. बालाजी फुट सेल प्रो. सचिन बबन गंगथडे, मे. अलताफ गफूर बागवान, मे. पांडुरंग ट्रेडींग कंपनी प्रो. पांडुरंग खरात, प्रेरणा ट्रेडींग कंपनी प्रो. प्रदिप बागल, श्री विठ्ठल ट्रेडींग कंपनी प्रो. राहुल सुभाष देवकर, राजकुमार दिपचंद फडे प्रो. अनिलकुमार दिपचंद फडे, मे. सुनिल दत्तात्रय भिंगे, तसेच जास्त शेतमाल खरेदी केल्याबद्दल खरेदीदार मे. कन्हैया ट्रेडींग कंपनी प्रो. मनोज मालु, श्री. मुस्ताक मन्सुर बागवान, मे. एम राउंड श्री. मुस्ताक इम ईब्राहिम बागवान यांचाही सन्मान करण्यांत आला.
यावेळी बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष व संचालक मा.श्री. सोमनाथ डोंबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्रध्दांजलीचा ठराव बाजार समितीचे संचालक मा.श्री. तानाजी पवार यांनी मांडला.
विषय वाचन व अहवाल वाचन सचिव श्री कुमार घोडके यांनी केले. बाजार समितीचे सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न रू.५,४८,६८,३९८/- झाले असून एकूण खर्च रू.३,४३,८१,७०३/- इतका वजा जाता सरप्लस / वाढावा रू.२,०४,८६,६९५/- इतका झालेला आहे. बाजार समितीची वार्षिक उलाढाल ६६० कोटी रूपये झालेली आहे.
शेवटी संचालक मा.श्री. महादेव पंढरीनाथ बागल यांनी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहा. सचिव श्री. गजेंद्र जोशी यांनी केले.
या सभेस कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा.श्री.दिनकरभाऊ मोरे, बाजार समितीचे माजी सभापती मा.श्री. कल्याणराव पाटील, माजी उपसभापती मा.श्री. लक्ष्मणराव धनवडे, मा.श्री. संतोष घोडके, मा.श्री. पंडितराव भोसले, मा.श्री. प्रशांतभैय्या देशमुख, मा.श्री. दिलीप गुरव, मा.श्री.तानाजीराव वाघमोडे, मा.श्री. बाळासाहेब शेख, मा.श्री. दत्तात्रय ताड, मा.श्री. इकबालभाई बागवान तसेच बाजार समितीचे संचालक मा.श्री. दिलीपराव चव्हाण, मा. श्री. हरिभाऊ फुगारे, मा.श्री. संतोष भिंगारे, मा.श्री.तानाजी पवार, मा.श्री. महादेव बागल, मा.सौ. शारदा अरूण नागटिळक, मा.सौ. संजिवनी बंडू पवार, मा.श्री. महादेव लवटे, मा.श्री. नागनाथ मोहिते, मा.श्री. अभिजीत कवडे, मा.श्री.पंडित शेंबडे, मा.श्री. वसंत चंदनशिवे, मा.श्री.शिवदास ताड, मा.श्री. यासीन बागवान, मा.श्री. आबाजी औदुंबर शिंदे तसेच तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटींचे चेअरमन व प्रतिनिधी, हमाल पंचायत प्रतिनिधी, ग्रामपंचायत सरपंच व प्रतिनिधी, आडते, व्यापारी प्रतिनिधी, बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
