*कै. सुरेश लिंबाजीराव पाटील (भाऊ) यांच्या 7 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी!*
*(ह.भ,प अनिकेत महाराज राऊत यांचा पुण्यतिथी निमित्ताने सुश्राव्य भक्तीमय कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न!)*
————————–
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
प्रेमळ आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज ‘सावली बंगला’, मोहोळ येथे पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ह.भ.प.अनिकेत महाराज राऊत यांचा भक्तिमय कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या पुण्यस्मरण कार्यक्रमास मोहोळ तालुक्याचे आमदार राजाभाऊ खरे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बळीराम काका साठे, माझे सासरे व माजी मंत्री विजय दादा कोलते,सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेसाहेब यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील पाटील परिवारावर मनापासून प्रेम करणारे नातेवाईक,आप्तेष्ट, मित्रपरिवार,हितचिंतक विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.सर्वांनी कै.भाऊंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
आज सात वर्षे उलटली असली तरी भाऊंची उणीव प्रत्येक क्षणी जाणवते. त्यांच्या प्रेमळ आठवणी सदैव आमच्या हृदयात जिवंत राहतील आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांचा वसा पुढे नेण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करू.
कै. सुरेशभाऊ लिंबाजीराव पाटील (भाऊ) यांना सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
