*शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर वाचला तक्रारींचा पाढा!*
*(आम्हाला कुठल्या प्रकारचा कसलाही रस्ता नको आहे आमच्या जमिनी आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत!)*
*(१९७५ ते ७८ सालापासून आम्ही द्राक्ष बागा जोपासत असून आमच्या जमिनी आम्ही कदापिही देणार नाही! शेतकरी संतप्त!)*
*(आमदारांनी व मंत्र्यांनी हा शक्तीपीठ महामार्ग दुसरा कुठूनही वाळवावा आमचे काहीही म्हणणे नाही)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षण पोलीस बंदोबस्तामध्ये करण्याचा घाट शासनाने करकंब येथे घातला असला तरी आपले बहुवार्षिक व जिद्दीने जोपसलेली द्राक्ष शेती उद्धवस्थ होणार असल्याच्या धास्तीने येथील शेतकऱ्यांनी निदर्शने करून शक्तिपीठला विरोध कायम असल्याचे दिसून आले
आज सकाळी सात वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तासह महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर ग्राउंड कंट्रोल पॉईंट घेण्याचे काम सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट दिसून आली
सकाळी 10 वाजनेच्या सुमारास प्रांताधिकारी सचिन इतापे, तहसीलदार सचिन लंगोटे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे,जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख,सपोनि योगेश लंगोटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून सर्व म्हणणे ऐकून घेतले व तुमची व्यथा शासनास कळविले जाईल असे सांगितले.यावर शेतकऱ्यांनी शासनाकडे सनदशीर मार्गाने न्याय मागणार असल्याचे सांगून असून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला
यावेळी ग्रामपंचायत सदस्य महादेव व्यवहारे, अमोल शेळके, बाळासाहेब हराळे, विठ्ठल हराळे,भारत धायगुडे,महेश व्यवहारे, अंकुश व्यवहारे, सचिन हराळे,मोहन धायगुडे, रमेश गुळमे, धनंजय गुळमे आदीसह शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होत्या
—————————
बंदोबस्तसाठी ७० प्लस पोलिसांचा फौजफाटा
करकंब येथून जात असलेल्या शक्तिपीठ मार्गमुळे येथील बहुवार्षिक बागा उध्वस्थ होत असल्याने येथील शेतकऱ्यानीं शक्तिपीठ महामार्ग जाहीर झाल्यापासून विरोध दर्शवीला आहे येथील शेतकऱ्यांचा तीव्र असलेला विरोध लक्षात घेऊन आज येथील शक्तिपीठ महार्गाचे सर्वेक्षण करताना शासनाने ७० पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता यामध्ये एक आयपीस अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दोन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चार, पोलीस कर्मचारी पन्नास, महिला पोलीस १५ असे ७० प्लस पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते यामध्ये सर्वेसाठी चार ड्रोनच्या टीम कार्यरत होत्या
—————————
*शेतकऱ्यांच्या व्यथा वरिष्ठ पातळीवर पोहचवून आमच्या कर्तव्याच्या चौकटीत राहून जे काही सहकार्य शेतकऱ्यांना करता येईल ते करू*
*सचिन इथापे*
*प्रांतधिकारी पंढरपूर*
*कोट क्रमांक २*
*शक्तिपीठ मार्गमुळे आमची शेती, द्राक्ष बागा, पाईपलाईन, विहिरी, बोअर, शेततळी, घरे उध्वस्थ होऊन व्यवहारे व हराळे वस्ती नकाशातून नमाशेष होणार असल्याने आमचा या मार्गाला विरोध असून to आम्ही लोकशाही मार्गाने करणार आहोत!*
*महेश व्यवहारे*
- *बाधित शेतकरी करकंब*
*कोट क्रमांक १*
*शक्तिपीठ मार्गात आमचे बागाईत शेती गेल्याने आमचे जर जीवन संपणार असेल तर आमची शेती वाचविण्यासाठी जीवन संपवायची तयारी आहे*
*अंकुश व्यवहारे*
*बाधित शेतकरी करकंब*
