शक्तिपीठ ड्रीम प्रोजेक्टच्या नव्या रेखांकनावरील विरोधामुळे प्रकल्प रखडणार तर जुन्या रेखांकनावरून प्रकल्प जलद गतीने पूर्णत्वाकडे जाणार:- प्रा.संग्राम चव्हाण
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून गाजत असलेला शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प पुन्हा एकदा विरोधाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसतो. शतिपीठ महामार्ग जुन्या आरक्षणा नुसारच जलद गतीने पूर्ण होऊ शकतो तर नवीन आरेखनानुसार तो अनिश्चित काळासाठी रखडू शकतो असे ठाम मत शक्तिपीठ बाधित शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते प्रा संग्राम दादा चव्हाण यांनी व्यक्त केले.. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते पुढे म्हणाले की… रस्ते म्हणजे देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या असून असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकला नको आहेत. आज सुमारे तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही शक्तिपीठ महामार्गा बांधकामाचे काम अजून सुरू नाही. यादरम्यान महागाईमुळे प्रकल्पाची अंदाजीत किंमत वाढू शकते. विरोध संपल्यामुळे हा महामार्ग जुन्या आरेखनाप्रमाणेच नेणे फायदेशीर ठरेल.
1) जुन्या अलाइनमेंट वर उत्तर सोलापूर,मोहोळ, पंढरपूर व सांगोला या 142 किलोमीटर लांबीच्या महामार्गा खालील गट मोजणी,संयुक्त मोजणी, मूल्यांकन समितीचे काम, अवॉर्ड वगैरे भूसंपादनाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे त्यासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी सुमारे दोन वर्ष मेहनत घेतली आहे.
2) बार्शी गौडगाव पासून नवी अलाइनमेंट स्वीकारलेली आहे . जुन्या अलाइनमेंट वर सर्व 100% टक्के शेतकऱ्यांनी लेखी भूसंपादनास सहकार्य केले आहे. महामार्ग वळवून सहकार्य केलेल्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे.
3) जुन्या अलाइनमेंट वर जमीन संपादित झाल्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षे उत्पन्न घेता आले नाही. त्यांच्या या तोट्यास कोण जबाबदार?
4) नवीन महामार्ग अलाइनमेंट साठी खर्चात 20,000 कोटींचा अतिरिक्त ताण राज्य शासनाच्या तिजोरीवर कशासाठी घ्यावयाचा?
5) नव्या अलाइनमेंट वर आर्थिक,सामाजिक व तांत्रिक अडचणींमुळे व शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट अनिश्चित काळासाठी रखडू शकतो.
6) नवीन अलाइनमेंट मुळे सुमारे 60 किलोमीटर एवढे अंतर वाढून पुढील पिढ्यांचा भविष्यातील वर्षानुवर्षे इंधनाचा व वेळेचा अपव्यय होणार आहे. हे राष्ट्रीय नुकसान कधीही भरून येणारे नाही.
7) नव्या अलाइनमेंट वरच्या तीव्र विरोधामुळे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट विरोधामुळे अनिश्चित काळासाठी रखडू शकेल.
8) वाळवा,इस्लामपूर वारणानगर या परिसरात दरडोई जमिनीचे प्रमाण कमी असल्यामुळे प्रचंड विरोध सुरू झाला आहे.
9) सीना नदी, भीमा नदी, नीरा नदी तसेच या सर्व नद्यांच्पा कालव्यावरील बागायत क्षेत्र पुढे कृष्णा नदी,वारणा नदी,भोगावती नदी यावरील विकसित झालेले प्रचंड बागायत क्षेत्र यामुळे नवीन अलाइनमेंट वर महामार्गाला प्रचंड विरोध सुरू झाला आहे.
10) कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांना संयुक्त मोजणीच्या नोटिसा न गेल्यामुळे त्यांचा प्रकल्पाला विरोध नाहीच हे सरकारला समजू शकले नाही. प्रकल्पाला विरोध राजू शेट्टी यांचे कार्यकर्ते करत आहेत की ज्यांचा एक गुंठा ही बाधित झालेला नाही.
11) सोलापूर,सांगली, कोल्हापूर या तीनही जिल्ह्यात प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांचा विरोध नसून राजू शेट्टी यांच्या संघटनेच्या कार्यकर्ते विरोध करताना दिसत आहेत. राजू शेट्टी यांच्या परिसरातील सर्व ग्रामपंचायतचे समर्थनाचे ठराव सीएम ऑफिस यांना तीनशे पानाच्या फाईल द्वारे पोहोचले आहेत.
12) जुन्या अलाइनमेंट वरील विरोधाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची स्वार्थी हेतूंनी दिशाभूल करण्यात आलेली दिसते. बहुतांश संबंधित नेते मंडळींनी गेल्या सव्वा वर्षांमध्ये नव्या अलाइनमेंट खाली शेकडो एकर जमीन खरेदी करून ठेवली आहे. जुन्या पेक्षा चांगली नवीन अलाइनमेंट देतो असे माननीय मुख्यमंत्री यांना खात्रीने सांगून नवीन अलाइनमेंट ला अप्रुव्हल घेतले गेले परंतु नवीन अलाइनमेंट वर जुन्या अलाइनमेंट पेक्षा दहापट विरोध सुरू झाला आहे.
13) प्रत्यक्षात जुन्या अलाइनमेंट वर शेतकऱ्यांचा कुठेही विरोध राहिलेला नाही. सर्व प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांनी लेखी समर्थनाची 300 पानी फाईल सीएम ऑफिसला सादर केली आहे. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.
14) पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातील मान खटाव तालुक्यातील गावे जुन्या महामार्गास ॲक्सेस रोड देऊन जोडता येऊ शकतात. त्यासाठी संपूर्ण महामार्ग वळवण्याची गरज काय व वीस हजारांहून कोटींचा अतिरिक्त ताण घेण्याची आणि 60 कि.मी. अंतर वाढवण्याची व इंधन आणि वेळेचा अपव्यय करण्याची गरज काय?
15) वाळवा,इस्लामपूर, वारणानगर कोल्हापूर या परिसरात दरडोई जमीनधारणा कमी असल्यामुळे व जमिनींचे बाजार भाव जास्त असल्यामुळे शेतकरी जीव देतील पण जमीन देणार नाहीत असे वास्तव चित्र दिसत आहे
16) अकलूज,पंढरपूर, माढा परिसरात निरा भीमा सीना खोरे व कालवा क्षेत्रात जुने विकसित बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथे भूसंपादनास प्रचंड विरोध आहे.
17) सोलापूर जिल्ह्यात जुन्या अलाइनमेंट वर दरडोई जमीन धारणा क्षेत्र जास्त मात्र सर्व शेतकरी प्रचंड कर्जबाजारी झाले असल्यामुळे त्यांनी स्वच्छेने प्रकल्पास जमिनी देण्याचे ठरवले आहे अन्यथा या परिसरात सुद्धा प्रकल्पास जमिनी मिळाल्या नसत्या. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे .
18) नीरानरसिंगपूर संगम, गोंदवले महाराज मंदिर, आदरणीय उदयनराजे महाराज यांचे शिखर शिंगणापूर ही देवस्थाने जोडत असताना पंढरपूर व तुळजापूर पासून नवीन महामार्ग 35 किलोमीटर दूर गेल्यामुळे पंढरपूरकर व तुळजापूरकर, मंगळवेढेकर नागरिक प्रचंड नाराज झाले आहेत.
19) वाळवा,इस्लामपूर, वारणानगर,कोल्हापूर हा परिसर व्यापारी औद्योगिक दृष्ट्या प्रगत असल्यामुळे व जमिनींचे बाजारभाव उच्च असल्यामुळे तीव्र विरोध असून भूसंपादन आव्हानात्मक आहे. मुख्यमंत्री साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट या परिसरात निश्चित पणे
रखडू शकतो.
20) नव्या महामार्ग अलाइनमेंट वरचे अनेक लोक हायकोर्ट मध्ये याचिका दाखल करण्याच्या तयारीत त्यामुळे प्रकल्प रखडू शकतो.
21) सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये सुमारे 142 किलोमीटर एवढ्या अंतरामधील भूसंपादनाचे काम पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे वाया गेली व आता नवीन अलाइनमेंट वर एवढेच काम पूर्ण होण्यासाठी आणखी तीन वर्षे जाणार म्हणजे नव्या अलाइनमेंट वर आदरणीय फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट नक्कीच रखडणार.
22) गौडगाव बार्शी ते सांगोला या 142 किलोमीटर लांबीच्या जुन्या अलाइनमेंट वरील भूसंपादनाचे काम 95 टक्के पूर्ण झाल्यामुळे जुन्या अलाइनमेंट वरूनच महामार्ग जलद गतीने पूर्ण होण्यास मदत होईल.
23) नवीन अलाइनमेंट च्या परिसरात पंढरपूर- कराड रस्ता, पंढरपूर-पुणे पालखी मार्ग, पंढरपूर-सातारा, सांगोला-विटा, इस्लामपूर- सांगली रस्ता, पुणे- बेंगलोर रस्ता, पुणे बेंगलोर ग्रीन कॉरिडोर नियोजित रस्ता अशा राष्ट्रीय महामार्गांचे अगोदरच जाळे पसरले आहे. त्यामुळे नवीन अलाइनमेंट प्रमाणे महामार्गाची उपयोगिता घटत आहे.
24) नवीन महामार्ग अलाइनमेंट ही लोकसंख्येची कमी घनता असलेल्या भागातून जात असल्याने लोकांच्या दृष्टिकोनातून या महामार्गाची उपयोगिता सुमारे 50% ने घटत आहे.
25) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ब्राह्मण समाजाच्या शेत्या बटईने कसायला दिल्या आहेत व त्यावर कसणाऱ्याचे कुळ लागले आहे, सदर जमिनीमधून महामार्ग गेल्यामुळे नुकसान भरपाई मूळ सातबारा उतारा मालकांना म्हणजे मूळ ब्राह्मण कुटुंबांना मिळणार असून जमिनी बळकावलेल्या टुकार मंडळींचे जगण्याचे साधन हिरावले जाणार असल्याने त्यांचा बेकायदेशीर विरोध दिसत आहे.
26) जुन्या अलाइनमेंट प्रमाणे महामार्ग सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील विकसित फळबाग शेती व भाजीपाला शेतीपट्ट्यातून जात असल्यामुळे शेतमालाच्या व दूध अंडी मांस यांच्या जलद वाहतुकीसाठी या शक्तिपीठ महामार्गाचा जास्त उपयोग होऊ शकेल. म्हणून जुन्या अलाइनमेंट वर सर्वच शेतकरी नागरिक व्यापारी उद्योजक यांनी शक्तिपीठ महामार्ग या मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे स्वागत केलेली दिसते. आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा महत्त्वकांक्षी शक्तिपीठ प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत असे मत प्रा. संग्राम चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

