*तालुकाध्यक्ष रमेश माने यांची सोलापूर जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य किंवा नियोजन समितीचे सदस्यपदी नियुक्ती व्हावी ही भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा*
(२००८ पासून पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करणाऱ्या रमेश माने यांना संधी द्यावी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी)
(पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन कल्याणशेट्टी , माजी आमदार राम सातपुते ,जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांनी एकनिष्ठ कार्यकर्त्याला द्यावा न्याय)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडलाचे तालुकाध्यक्ष रमेश लक्ष्मण माने यांना आगामी होणाऱ्या सोलापूर जिल्हा स्वीकृत सदस्य पदी किंवा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीमध्ये न्याय द्यावा अशी आग्रही मागणी, मोहोळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मागणी
2008 पासून भाजपा पक्षासाठी एकनिष्ठपणे प्रत्येक कार्यक्रमामध्ये , निवडणूकी मध्ये सक्रियपणे सर्व जबाबदारी समर्थपणे पेलून काम करणाऱ्या रमेश माने यांनी सर्व आपल्या भारतीय जनता पार्टीचे जबाबदाऱ्या पूर्णपणे चांगल्या पद्धतीने वेळोवेळी पार पडल्या असून 2009 पासून आतापर्यंत लोकसभा जिल्हा परिषद पंचायत समिती याबरोबर ग्रामीण स्तरावरील सर्वच निवडणुकांमध्ये पक्षी नेतृत्वाने दिलेली प्रत्येक जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडून त्याचे योग्य नियोजन करून भारतीय जनता पार्टी चे काम प्रत्येक बुथ पातळीपासून ते प्रत्येक, घरापर्यंत नेण्यामध्ये जबाबदारी प्रामाणिकपणे आत्तापर्यंत सक्रियपणे त्यांनी पार पाडली असून, पक्षाने मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी मंदसौर शहरामध्ये त्यांना पंधरा दिवस भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाने विस्तारक म्हणून त्यांना पाठवले होते त्याचप्रमाणे संघटना वाढीबरोबरच, संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आजपर्यंत मोहोळ तालुक्यामध्ये महत्त्वपूर्ण समजले जाते.. यामुळेच एकंदरीत तालुकाध्यक्ष रमेश माने यांचा पक्षाने योग्य रीतीने विचार करून त्यांना सोलापूर स्वीकृत सदस्यपदी किंवा जिल्ह्याच्या नियोजन समितीमध्ये स्थान देण्यात यावे अशी मागणीचा जोर वाढत आहे..
पालकमंत्री जयकुमार गोरे ,आमदार सचिन कल्याणशेट्टी माजी आमदार रामभाऊ सातपुते मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन मालक पाटील ,भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी आमदार, यशवंत तात्या माने, बाळराजे पाटील, रमेश लक्ष्मण माने यांना संपूर्ण मोहोळ तालुक्यातून निकीच न्याय देतील कार्यकर्त्यांना विश्वास आहे
आगामी नियोजन मंडळाच्या निवडीमध्ये घेताना स्थान देण्यात आले तर पेनुर हे मोहोळ तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे व पेनुर परिसराचा महत्त्वपूर्ण विकास करण्यामध्ये त्यांनी मोठा हातभार लावला आहे यापुढे देखील
ते सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत

