(देवासारखे धावून आले,मा. आमदार यशवंत तात्या माने
( अपघात झालेल्या प्रकाश सपाटेच्या उपचारासाठी उचलला हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च)
तारापूर गावातील गरीब कुटुंबाला दिलासा – लाईफ लाईन हॉस्पिटलचे सर्व बिल भरून माजी आमदार माने यांनी दाखवली समाजसेवेची जिवंत भावना.
तारापूर गावातील एका गरीब कुटुंबावर आलेल्या मोठ्या संकटाच्या काळात माजी आमदार यशवंत तात्या माने यांनी मदतीचा हात पुढे करत पुन्हा एकदा आपल्या समाजाभिमुख कार्याची प्रचिती दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रकाश सपाटे या मुलाच्या उपचारासाठी लागणारा संपूर्ण खर्च उचलून त्यांनी त्या कुटुंबाला मोठा दिलासा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारापूर येथील प्रकाश सपाटे या गरीब कुटुंबातील मुलाचा अचानक अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याचे डॉ. सांगितल्याने सपाटे कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढवले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे उपचाराचा खर्च करणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय झाले होते.
ही बाब समजताच तारापूर गावचे सरपंच प्रदीप दादा निर्मळ तसेच रणजीत जगताप समाधान शिंदे गावातील इतर सहकाऱ्यांनी तातडीने माजी आमदार यशवंत तात्या माने यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. गरीब कुटुंबावर आलेले संकट ऐकून तात्या माने यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा निर्णय घेतला.
जखमी प्रकाश सपाटे याच्यावर उपचार सुरू असलेल्या लाईफ लाईन हॉस्पिटलमधील सर्व बिल स्वतः भरून त्यांनी त्या कुटुंबाला मोठा आधार दिला. त्यांच्या या मदतीमुळे सपाटे कुटुंबाला दिलासा मिळाला असून मुलावर योग्य उपचार सुरू ठेवणे शक्य झाले आहे.
माजी आमदार यशवंत तात्या माने हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गरजू, गरीब आणि संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी ते नेहमी पुढे येतात. त्यांच्या अशा अनेक समाजोपयोगी कार्यामुळे ते जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.
या घटनेमुळे पुन्हा एकदा त्यांच्या संवेदनशील व समाजाभिमुख स्वभावाचे दर्शन घडले. “सामान्य माणसाच्या अडचणीच्या वेळी मदतीला धावून जाणे हीच खरी लोकसेवा” या विचाराने ते सातत्याने कार्य करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
तारापूर गावातील नागरिकांनी माजी आमदार यशवंत तात्या माने यांचे मनापासून आभार मानले असून त्यांच्या या मदतीमुळे गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली. सध्या प्रकाश सपाटे याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळत आहे. गावातील सर्व नागरिक त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
