भीमा परिवाराकडून लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन:- सुनील दादा चव्हाण
(खासदार धनंजय महाडिक मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील इच्छुकांच्या घेणार पुळुज येथील भीमा शेडवर मुलाखती)
(भाजपाने व खासदार धनंजय महाडिक यांनी ताकद दिल्यास पेनुर जिल्हा परिषद निवडणूक लढवणार:- संचालक सुनील दादा चव्हाण)
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
सोलापूर जिल्ह्यातील ६८ जिल्हा परिषदेचे बिगुल वाजले असून यामध्ये, प्रामुख्याने चर्चेत आलेले नाव म्हणजे मोहोळ तालुक्यातील पेनुर जिल्हा परिषद गट या जिल्हा परिषद गटामध्ये अनेक मातब्बर नेते मंडळींनी चांगलीच मोर्चे बांधणी केलेली असताना नव्याने अजून एक नाव चर्चेत आले असून ते म्हणजे मोहोळ भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा भिमाचे संचालक सुनील दादा रावसाहेब चव्हाण यांचे आहे.. भीमा परिवाराचे सर्वेसर्वा राज्यसेवेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक हे लवकरच आपल्या पुळुज येथील भीमा शेडवर सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत असे खात्रीलायक वृत्त असून, भीमा परिवाराकडून ज्यांना उमेदवारी पाहिजे असेल इच्छुक असतील त्या सर्वांची एक बैठकही लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भिमाचे संचालक सुनील दादा चव्हाण यांनी दिली..
पेनुर जिल्हा परिषद गट, कुरुल जिल्हा परिषद गट व पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर जिल्हा परिषद व रोपळे जिल्हा परिषद गटांमध्ये भीमा कारखान्याचे मोठे कार्यक्षेत्र असून त्या ठिकाणी खासदार महाडिक यांचे असंख्य समर्थक व कार्यकर्ते व सभासद आहेत.. या जवळजवळ चार ते पाच जिल्हा परिषद गटावर भीमा परिवाराची चांगली पकड असून, या ठिकाणी त्यांची चांगली पकड आहे यामुळे पुन्हा एकदा मोहोळ पंढरपूर तालुक्याच्या, राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका पुन्हा एकदा महत्त्वाची ठरणार आहे. यासाठीच त्यांनी पुळुज येथील आपल्या फार्म हाऊस वर बैठकीचे आयोजन केले असल्याची संचालक सुनील दादा चव्हाण यांनी सांगितले असून यासाठी 17 जानेवारी किंवा 18 जानेवारी तारखेला बैठक होणार असल्याचे समजत आहे याबाबतीत सर्व जिल्हा परिषद गटातील व गणातील इच्छुकांनी या बैठकीला मोठ्या संख्येने हजर राहण्याची आवाहन ही यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व संचालक सुनील दादा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले…
