
*भाजपा तालुकाध्यक्ष रमेश माने यांचा पूरग्रस्तांना मोठा आधार!*
*(जिल्हाध्यक्ष श्री शशिकांत नाना यांच्या नियोजनाखाली तरटगाव भागातील पूरग्रस्त सर्व नागरिकांना व शेतकऱ्यांना फराळ, पाणी वाटप, व बिस्किटांचे मोठ्या प्रमाणात वाटप!)*
*(भारतीय जनता पार्टीमुळे बाधित नागरिकांना मिळाला मोठा दिलासा)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
मोहोळ तालुक्यातील तरटगाव येथे सीना नदीला आलेल्या पुरामुळे गावामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
या ठिकाणी मोहोळ दक्षिण मंडल अध्यक्ष श्री रमेश माने यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गावकऱ्यांना दिलासा दिला व बिस्किट ,शाबु फराळ, पाणी बॉटल
यांचे वाटप करून मदतकार्यात सहभाग घेतला
तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार (भाऊ) गोरे साहेब यांना सद्यस्थितीची सविस्तर माहिती देण्यात आली असून, प्रशासनाच्या सहकार्याने गावातील पूरपरिस्थिती समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संकटाच्या काळात गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून मदतकार्य सुरू आहे.भाजपा सरचिटणीस विकास वाघमारे, भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस दिपाली कोरे मॅडम , मोहोळ उत्तर मंडल भाजपा सरचिटणीस श्री अरविंद माने उपस्थित होते…
