
तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची मागणी!!
(या मागणीला पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी दिला ग्रीन सिग्नल)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून धुव्वाधार पडत असलेल्या पावसामुळे मोहोळ ,सह पंढरपूर तालुक्यातील शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, उडीद, द्राक्ष, डाळिंब, सोयाबीन, ऊस यासह सर्वच पिके हातातून गेली आहेत. सरसकट मोहोळ सह पंढरपूर तालुक्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसाई भरपाई मिळाली पाहिजे ही मागणी पालकमंत्री श्री. जयकुमार (भाऊ) गोरे यांच्याकडेमागणी केली. तातडीने बाधित शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले पाहिजे अशीही मागणी यावेळी केली. पालकमंत्री महोदयांनी प्रांताधिकारी श्री इथापे साहेब यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत (नाना) चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, मोहोळ उत्तर मंडल अध्यक्ष सतीश काळे,श्री शंकरराव वाघमारे , श्री सुनील चव्हाण, श्री महेश सोहनी,श्री सुशील क्षीरसागर , श्री लिगराग शेंडगे , श्री तानाजी पुजारी, श्री अरविंद माने, अँड.सौ. श्रीदेवी काटे मॅडम ,श्री महेश राऊत, श्री अविनाश पांढरे , श्री गुरुराज तागडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
