बहुजन सत्यशोधक संघ माढा तालुकाध्यक्षपदी मसाजी नाईकनवरे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

बहुजन सत्यशोधक संघ ही सकल बहुजन एस सी. एस टी. ओबीसी, सर्व धर्म परिवर्तन यांच्या सर्वकष मुक्तीसाठी काम करणारी संघटना आहे या संघटनेच्या माढा तालुका अध्यक्षपदी मसाजी नाईकनवरे यांची निवड बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष गणेश देवकते यांनी केली. यावेळी मसाजी नाईकनवरे बोलताना म्हणाले की बहुजना वर होणारे अन्याय अत्याचारित पिडीतांना न्याय मिळवून देणार, बेरोजगार युवक, वीट बिगार कामगार भूमिहीन शेतमजूर, कष्टकरी यासाठी काम करणार, प्रयत्न करणार विद्यार्थ्यांचा अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार, फुले. शाहू. आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवून संघटना घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम या माध्यमातून करेन असे ते म्हणाले. बहुजन सत्यशोधक संघाचे नेते प्रशांत नाईकनवरे म्हणाले की ओबीसीची जातिनिहाय जनगणना तात्काळ शासनाने करावी, एसटी एसटी चे पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करावे, शासनाने सर्व योजना लोकांपर्यंत पोचवून त्याचा लाभ सर्वांना मिळेल याची दक्षता घ्यावी, बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता चालू करण्यात यावा, शासनाने सर्व क्षेत्रातील खाजगीकरण थांबवावे,असे अनेक मुद्द्यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. असून यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश देवकते, अनिल सरवदे, प्रशांत नाईकनवरे, नितीन वाघमारे बाबासाहेब पाटोळे, श्रीकांत जवंजाळ, योगेश इंगळे, नानासाहेब वाघमोडे, रोहित रावडे, दादा गायकवाड, समाधान माळी, राजू गायकवाड, आदित्य नाईक नवरे, सतीश वाघमारे, महिंद्र शिंदे, सुरेश वाघमारे, सुनील लोंढे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here