
सोलापुरात युवा आणि युवती सेनेच्या वतीने विद्यार्थी करिअर मेळावा आणि गुणवंताचा सन्मान उत्साहात संपन्न
दि.३० जून २०२५ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सोलापूर येथे “करियर मार्गदर्शन मेळावा” आणि “विद्यार्थी गुणवंत समारंभ” उत्साहात संपन्न झाले. हा कार्यक्रम युवतीसेना व युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सर्व पालक आणि गुणवंत विद्यार्थी तसेच इतर शाळेतील आलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी १२.०० ते सायं ६.०० पर्यंत कार्यक्रम सुरू होता.अचीवर्स हॉल,पोलिस हेड क्वार्टर च्या समोर,सिविल चौक,सोलापूर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
“पोरा अजून थोडं लढून बघ” या प्रेरणादायी विषयावर प्राध्यापक विक्रमसिंह मगर सरांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्राध्यापक व्यवहारे सरांनी देखील विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेल्या समी मौलवी व प्रियंकाताई परांडे यांचेही विशेष कौतुक करून उपस्थित मुलींना त्यांचा आदर्श घेण्यास सांगितले. या कार्यक्रमास उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्तींनी विद्यार्थ्यांच्या करियर संदर्भातील दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून – सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे,माढा लोकसभा संपर्क प्रमुख
संजय कोकाटे,म आ संपर्क प्रमुख अनिताताई माळगे,जिल्हाप्रमुख- अमोल बापू शिंदे,अमरजी पाटील,कार्यकारणी सदस्य सुजित खुर्द, प्रियदर्शन साठे,गणेश जाधव,महादेव भोसले,रूपाताई चव्हाण,गौतमी लोंढे,स्नेहा चवरे,कृष्णाताई बिराजदार,नामदेव पवार,आशिष जेठीथोड इ. उपस्थित होते.