कै.औदुंबराव पाटील यांच्या 98व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी आमदार कै.औदुंबर पाटील यांच्या 98 व्या जयंतीचे निमित्त साधून विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी उद्या मंगळवारी (ता. 23) दुपारी पंढरपुरात विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.


मंगळवारी (ता. 23) रोजी कै.औदुंबरराव पाटील यांची 98 वी जयंती आहे. जयंतीच्या निमित्ताने येथील श्री विठ्ठल हॉस्पिटलमध्ये विविध मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर श्री विठ्ठल हॉस्पिटलच्या आवारात दुपारी शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. युवराजदादा पाटील यांनी विठ्ठल परिवारातील तालुक्यातील सर्व सभासद व शेतकऱ्यांना मेळाव्यासाठी निमंत्रित केले आहे.

 

यामध्ये परिवारातील ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, सहकार शिरोमणी कारखान्याचे माजी संचालक दामोदर पवार, ‘विठ्ठल’चे माजी संचालक प्रकाश पाटील, मोहन उपासे, रावसाहेब चव्हाण, माजी सभापती राजेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, तात्यासाहेब निकम, विलास साळुंखे, श्रीमंत देशमुख, हभप एकनाथ महाराज हांडे आदी उपस्थित राहणार आहेत.
या शेतकरी मेळाव्यास तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी युवराजदादा पाटील यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here