सत्ताधारी महाराष्ट्राची यूपी बिहार पेक्षा वाईट अवस्था केली आहे, संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार :- खा. प्रणिती शिंदे
(खासदार प्रणितीताई शिंदे यांनी मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली)
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबीयांची खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाले की, गेली पंधरा वर्ष सरपंच असणारे, सर्वांना सहकार्य करणारे संतोष देशमुख हे आदर्श सरपंच होते. मस्साजोग मध्ये जे काही घडलं त्याच्यात त्यांचा काही संबंध नसताना, तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतोय म्हणून कुणी बाहेरून येतं, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करून त्यांची हत्या केली जातो हे चित्र अतिशय भयानक आहे. आजपर्यंत आरोपी फरार आहेत. सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे. विधासभेत आवाज उठविल्यानंतर थोडीफार कारवाईचे नाटक केले जात आहे. प्रशासनावर प्रचंड दबाव आहे. त्यांचे कुटुंबीय सुद्धा भीतीच्या सावटाखाली आहे. त्यांना पोलिस संरक्षण मिळाले पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राची अवस्था यूपी बिहार पेक्षा वाईट केली आहे. संतोष देशमुख यांच्या आरोपींना अटक झाल्याशिवाय. काँग्रेस गप्प बसणार नाही या कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी सोलापूरचे खासदार प्रणितीताई शिंदे, आमदार अमित देशमुख, लातूरचे खासदार डॅा. शिवाजीराव काळगे, नादेंडचे खासदार श्री.रविंद्र चव्हाण यांच्यासह इतर नेतेमंडळी उपस्थित होते.