वझरे गावच्या सरपंचपदी शिवसेनेच्या सौ. बानू चव्हाण तर उपसरपंचपदी लक्ष्मण वाघमारे यांची बिनविरोध निवड ; आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
सांगोला तालुक्यातील वझरे गावच्या सरपंचपदी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गटाच्या शिवसेनेच्या सौ. बानू मल्हारी चव्हाण यांची सरपंचपदी तर लक्ष्मण गोविंद वाघमारे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली . त्याबद्दल आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते संपर्क कार्यालयामध्ये नूतन सरपंच ,उपसरपंचांचा सत्कार करून भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विधानसभा प्रमुख प्रा. संजय देशमुख, शिवसेनेचे शिवाजी घेरडे, शिवसेनेचे नेते दादासाहेब वाघमोडे सर, उत्तम सरगर सर, तसेच वझरे गावचे माजी उपसरपंच बाबुराव जाधव, माजी सरपंच भिकू वाघमारे, सचिन यादव, विजय कोटे, आप्पा चव्हाण, उमाजी चव्हाण, स्वप्निल रेड्डी, वसंत रामचंद्र पाटील, राजू पाटील, मल्हारी चव्हाण, शिवाजी चव्हाण ,विलास चव्हाण, दत्तात्रय शिवाप्पा पाटील ,भारत रेड्डी ,बलभीम चव्हाण, लक्ष्मण मंडले, मोहन चव्हाण, समाधान यादवशेठ, श्रीधर यादव, पिंटू यादव ,रमेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेना गटाच्या वझरे गावच्या सरपंचपदी बानू चव्हाण तर उपसरपंचपदी लक्ष्मण वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मान्यवरांकडून सरपंच, उपसरपंच यांचे अभिनंदन करण्यात आले.