अनेक वर्षाचा मागणीनंतर औंढी येथील मातंग वस्ती येथील प्रश्न लागला मार्गी!
औंढी येथील विविध विकास कामांचे मा.पवन (भैय्या) महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न!
सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या माध्यमातून विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध:पवनभैय्या महाडिक
औंढी येथील मातंग वस्ती ते पाण्या टाकीपर्यंत पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ व इतर विविध विकास कामांचा शुभारंभ भिमा परिवाराची युवा नेते पवन भैया महाडिक यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाला.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून खासदार मा.धनंजय महाडिक यांच्या सहकार्यातून तसेच मा.पवन (भैय्या) महाडिक यांच्या अथक परिश्रमातून जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत मोहोळ तालुक्यातील औंढी येथे विविध विकास कामे मंजूर केली आहेत.
या वस्तीवरील मातंग समाजातील लोकांची मोठी गैरसोय यामुळे दूर झाले असून वर्षानुवर्षाची मागणी युवानेते पवन भैया महाडिक यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण झाली आहे. या पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी भीमा परिवाराची युवा नेते पवन भैया महाडिक यांनी मी औंढी गावाच्या विविध विकास कामांसाठी कटिबद्ध असून याच कामाबरोबर अनेक विविध विकास कामे त्यावर विविध प्रकल्प आणून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार असून अजूनही काही गावातील नागरिकांच्या मागणीनुसार विविध ठिकाणच्या कामासाठी मी मोठा प्रयत्न करणार आहे.
या विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख प्रियंका ताई परांडे पाटील, भिमाचे मा. संचालक प्रकाश बचुटे उपसरपंच औंढी, संचालक दादासाहेब नाशिकेत शिंदे मा.संचालक भिमा शुगर, पांडुरंग (आण्णा) बचुटे लोकनेते शिक्षण संस्था अध्यक्ष, गणेशपापा चव्हाण, तानाजी शिंदे, ग्रामसेवक राऊत,अर्जुन शिंदे,अरूण मदने मा.संचालक भिमा शुगर, शाहू काशिद, हणमंत शिंदे, हणमंत साळुंखे, सुभाष बचुटे,बंडु शिंदे, गणेश पडसाळकर, आप्पा कांबळे, दत्ता व्हाळगुंडे, अमरजीत बचुटे, विश्वतेज बचुटे, जगदीश कोळी, हिंदूराव भुसे, सिताराम भुसे पोलीस पाटील, विष्णू शिंदे सेवक रोजगार समिती आदी मान्यवर उपस्थित होते.