पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न मनसेच्या पाठपुराव्यामुळे मार्गी : दिलीप धोत्रे
पंढरपूर एमआयडीसीला मंजुरी मिळाल्यानंतर मनसेने नेते दिलीप धोत्रे यांनी मानले शासन आणि प्रशासनाचे आभार
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून कासेगाव येथे एमआयडीसी उभारण्याला काही दिवसापूर्वी औद्योगिक विकास महामंडळाची मंजुरी मिळाली आहे.यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शर्तीचे प्रयत्न केले होते. अखेर याला यश आले असल्याची माहिती मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी पंढरपूर येथे मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी शासन आणि प्रशासनाचे आभार मानले.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तसेच पंढरपूर येथील युवक, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना दिलीपबापू धोत्रे म्हणाले की गेली अनेक वर्षांपासून पंढरपुर परिसरात एमआयडीसी उभारण्यात यावी अशी मागणी होती. यासाठी मनसे कडून पाठपुरावा सुरू होता.
मात्र आपल्या संस्थेमध्ये कोण कामाला मिळणार नाहीत या भीतीमुळे पंढरपूर येथील नेतेमंडळींनी याला विरोध केला असल्याचा आरोप मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला. पंढरपूर परिसरात एमआयडीसी व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून प्रयत्न केल्याने एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र एमआयडीसी मंजूर झाल्यावर लोकप्रतिनिधी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.