मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसा निमीत्त मंगळवेढा येथे रंगला खेळ पैठणीचा!
(खेळ पैठणीच्या माध्यमातून प्रशांत परिचारक यांची विधानसभेसाठी जेरदार तयारी मंगळवेढ्यात मोर्चे बांधणीला सुरुवात)
(पांडुरंग परिवारातील समर्थकांना प्रशांत परिचारक यांनी मागे न हटण्याचा दिला महत्वपूर्ण सल्ला)
सोलापूर जिल्ह्याचे नेते मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसा निमीत्त मंगळवेढा येथे पांडुरंग परिवाराने आयोजित केलेल्या होम मिनीस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमास महीलांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.
मंगळवेढा शहरातील सुमारे २००० महीला होम मिनीस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.सिनेअभिनेता क्रांतिनाना मळेगावकर व बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांनी गप्पा,गाणी,महीलांचे खेळ व प्रश्नमंजुषाच्या माध्यममातून उपस्थितांची मने जिंकली.
स्व.कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक(मोठे मालक)यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन धनश्री मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभाताई काळुंगे,विनयाताई परिचारक,जिजामाता पतसंस्थेच्या चेअरमन आशाताई नागणे व आमृताताई परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अरुणाताई माळी,सुप्रियाताई जगताप,शितलताई बुरकुल,तेजस्विनीताई कदम,डॉ.प्रितीताई शिर्के,लक्ष्मीताई वाकडे,रजैय्याताई शेख,सुनिताताई वाडदेकर,मोहीनीताई सरकळे,राजश्रीताई घुले,विशाखाताई खवतोडे,रंजनाताई जगदाळे,जन्नतबीताई सुतार,माधुरीताई हजारे,राजश्री घुले या विवीध क्षेञातील मान्यवर महीलाभगिनी उपस्थित होत्या.
५०० महीलांनी खेळामध्ये उत्सफुर्तपणे सहभाग नोंदविला होता.विजेत्या महीलांना प्रथम क्रमांकाचे बक्षिस एलईडी टिव्ही.द्वीतीय क्रमाकांचे बक्षिस फ्रिज,तृतीय क्रमाकांचे बक्षिस वाशिंग मशीन,चतुर्थ क्रमांकाचे बक्षिस पिठाची चक्की,पाचव्या क्रमांकाचे बक्षिस शिलाई मशिन याबरोबरच उतकृष्ठ खेळ करणा-या महीलांना उत्तेजनार्थ १०० पैठणी साड्या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या.तसेच होम मिनीस्टर खेळ पैठणीच्या उपस्थित सहभागी सर्वच महीलांना आकर्षक भेटवस्तु देण्यात आली.
उपस्थित असणा-या असंख्य महीलाभगींनीनी रक्षाबंधनाचा सण असल्याने आपला भाऊराया मा.आ.प्रशांत परिचारक यांना राखी बांधण्यात आली.प्रत्येक महीलाभगीनींच्या चेह-यावरती या कार्यक्रमामुळे एक वेगळेच हास्य होते.सर्वच माय माऊलींनी प्रशांत परिचारक यांना आशिर्वाद देत आम्ही त्यानांच आमदार करणार असल्याचे सांगत होत्या.
यावेळी बोलताना मा.आ.प्रशांत परिचारक म्हणाले,महीलांनी फक्त चुल आणि मुल न बघता माझी मायमाऊली घरातुन बाहेर पडली पाहीजे.त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहीजे.महिला ही सक्षमीकरणाच्या माध्यमातुन पुढे गेली पाहीजे.सर्वच क्षेञामध्ये आता महीला पुढे आल्या आहेत.रक्षाबंधनाच्या निमीत्ताने मला मायमाउलींनी आशिर्वाद दिले.आज खेळ पैठणीच्या कार्यक्रमातुन हजारो महीलाभगिनींच्या चेह-यावरचा आनंद मनाला समाधान देणारा होता.मायमाउलीनी उत्सफुर्त प्रतिसाद देत खेळामध्ये सहभाग नोंदविल्याबद्दल आभार व्यत केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दामाजी शुगरचे संचालक औदुंबर वाडदेकर,न.पा.पक्षनेते अजि जगताप,दामाजी शुगरचे संचालक गौरीशंकर बुरकुल,मंगळवेढा सह.सुतगिरणीचे संचालक पप्पु स्वामी,धनंजय व्यव्हारे,मा,आ.प्रशांत परिचारक युवा मंचचे अध्यक्ष बबलु सुतार,सद्दाम शेख यांचेसह पांडुरंग परिवारातील पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुञसंचलन भारत मुढे यांनी केले.