न्यु सातारा कॉलेजमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोर्टी येथील न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री. विक्रम लोंढे, उपप्राचार्य विशाल बाड, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन कॉलेजचे प्राचार्य विक्रम लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर फुले वाहून प्रसादाचे वितरण ही करण्यात आले. यावेळी त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून आणि कवितांमधून समाजातील विविध प्रश्नांना कशी वाचा फोडली , त्यांच्या कलेमधून त्यांनी समाजातील अन्याय, अत्याचार आणि विषमता करावी कशी उघड केली. त्यांच्या प्रबोधनात्मक कार्यामुळे त्यांनी अनेकांना कसे प्रेरित केले. त्यांचे विचार आजही कशाप्रकारे प्रेरणादायी आहेत हे सांगण्यात आले.तसेच त्यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करुया आणि त्यांच्या विचारांचा आदर करूया असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. अशाप्रकारे मोठ्या उत्साहामध्ये कॉलेजमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजाराम निकम साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे प्रतिनिधी मा.श्री. ज्ञानेश्वर शेंडगे साहेब यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सुरज जैयस्वाल सर यांनी केले.