बाजार समित्यांमध्ये ई पीक पाहणीचा कक्ष सुरू करण्याचे जिल्हाधिकऱ्यांचे आदेश

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

बाजार समित्यांमध्ये ई पीक पाहणीचा कक्ष सुरू करण्याचे जिल्हाधिकऱ्यांचे आदेश

 

सोलापूर, दि.29 :- राज्य शासनाची ई पीक पाहणी ही महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी योजनाचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी लिलावाच्या ठिकाणी ई पीक पाहणी माहितीचा कक्ष सुरू करावा असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिले .

ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी तथा ई पीक पाहणीचे समन्वय नागेश पाटील, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.जी. पांडेकर, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, कृषी सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यु.एस.मोहिते आदी उपस्थित होते.

श्री. शंभरकर म्हणाले, ई पीक पाहणीचे काम सर्व संघटनांनी समन्वयाने करावे. ई पीक पाहणी स्वत: करा त्याची लोकांना माहिती द्या. यामुळे या योजनेचा प्रचार व प्रसार वाढेल. यामुळे प्रत्येकाचे काम लवकर पूर्ण होईल. संघटना निहाय व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करा. या ग्रुपवर कमी प्रतिसादाची गावे, तालुके यांची माहिती द्या.

महा ई सेवा आणि कृषी सेवा केंद्रानी फ्लेक्स, पोस्टर, बॅनरव्दारे योजनेची प्रचार प्रसिध्दी करावी , असेही त्यांनी आवाहन केले.

रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा मेळावा घेवून ई पीक पाहणीची माहिती आणि प्रात्यक्षिक दाखविण्याचे कृषी विभागाने सांगितले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी, कृषी सेवा केंद्र संघटनेचे प्रतिनिधी, महा ई सेवा केंद्राचे प्रतिनिधी , चीटबॉय संघटनेचे प्रतिनिधी, रास्त धान्य दुकान संघटनेचे प्रतिनिधी, कोतवाल संघटनेचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here