मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केले मुबिना मुलाणी यांनी अभिनंदन!
लाडकी बहीण योजनेला सोलापूर जिल्ह्यात महिलांचा आपल्या योजनेला मोठा प्रतिसाद!
आषाढी एकादशी पूर्वी पंढरपूरला येण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले मुलाणी मॅडम यांना आश्वासन!
सोलापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष व पंढरपूर पंचायत समितीच्या सदस्या मुबिना मुलाणी, यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली असून त्यांनी या भेटीमध्ये राज्य शासनातर्फे नव्याने जाहीर केलेल्या लेक लाडकी योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले असून या योजनेला संपूर्ण महाराष्ट्र राज्य बरोबरच सोलापूर जिल्ह्यातून महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या योजने बाबत काही ठिकाणी तक्रारी असून या लवकरच दूर केल्या जातील त्याचप्रमाणे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने या योजनेबाबत उत्पन्नाचा दाखला व रहिवासी दाखला ही अट काढल्यामुळे या योजनेबाबत शहरी त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील गोरगरीब महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून ही योजना नक्कीच राज्य सरकारला आगामी निवडणुकांमध्ये उपयोगी ठरणार असल्याचे दिसत आहे. याबाबत मुबिना मुलानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून याबाबत त्यांनी आषाढी यात्रेपूर्वी एक दोन दिवस मी आवर्जून पंढरपूरला येणार असल्याचे सांगितले असल्याचे सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मुबिना मुलांणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.