२४ हजार ४७०कोटींपेक्षा अधिक निधी पंढरपूर रेल्वे स्थानकाला मंजूर मा आमदार प्रशांत परिचारक यांची माहिती  प्रशांत मालकांनी रेल्वे स्टेशनची पाहणी करतात कामाला आली गती

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

२४ हजार ४७०कोटींपेक्षा अधिक निधी पंढरपूर रेल्वे स्थानकाला मंजूर मा आमदार प्रशांत परिचारक यांची माहिती

 

प्रशांत मालकांनी रेल्वे स्टेशनची पाहणी करतात कामाला आली गती

देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांचा केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या २४,४७० कोटींपेक्षा अधिक निधीतून संपूर्ण कायापालट होणार आहे.

या यादीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या नगरीतील पंढरपूर रेल्वे स्थानकाचा समावेश असून यासाठी ४० कोटींचा विकासनिधी मंजूर झाला आहे. याचे भूमिपूजन आदरणीय देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ऑनलाइन पद्धतीने केले होते.

या विकास कामाला ख-या अर्थाने सुरुवात ही झाली आहे. यामध्ये पंढरपूर रेल्वे स्टेशन तसेच परिसरात या होणाऱ्या कामांची माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी पाहणी केली व येथील काही नवीन रस्ते करून देण्याबाबतची व रेल्वे प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

यावेळी रेल्वे प्रशासनाचे ADEN जनार्दन प्रसाद ,नगरसेवक श्री विवेक परदेशी, श्री धर्मराज घोडके, श्री. मिलिंद येळे आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here