स्वेरी पॉलिटेक्निक मध्ये ‘कोविड-१९ लसीकरण मोहिमे’चे उदघाटन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

१५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना मिळतोय कोविड-१९ प्रतिबंधक पहिला डोस

पंढरपूर- एम.एस.बी.टी.ई.तथा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनमुंबई यांच्या सूचनेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक दिवसीय कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

     मागील दोन वर्षापासून कोविड महामारीमुळे सर्व शाळामहाविद्यालये शासनाच्या आदेशानुसार बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण सुरू आहे. एकीकडे विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षणासाठी येण्यास तयार आहेत पण दुसरीकडे मात्र त्या विद्यार्थ्यांचे वय कमी असल्याने ते लस  घेण्यासाठी पात्र नव्हते. आता या प्रश्नावर प्रशासनाने योग्य तोडगा काढला असून १५ ते १८ वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सर्वत्र या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण मोहिमेला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणासाठी अनेक विद्यार्थी पुढे येत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. शासनाच्या सूचनेनुसार स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाने व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या कोविड-१९ च्या लसीकरण मोहिमेचे उदघाटन  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. संध्या पाटील व डॉ. शुभांगी गुंजाळ यांच्या तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.महेश गुरवआरोग्य सेवक संतोष लिगाडेआरोग्य सेविका श्रीमती संगीता जाधवश्रीमती सावित्री होनरावकविता घायाळसुनिता पाटील या उपकेंद्र आरोग्य सेवककर्मचारीआरोग्य सेविका व आशा वर्कर्स यांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. आरोग्य अधिकारी डॉ. गुरव यांनी लस घेतलेल्या युवकांनी व विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रचार व प्रसार केला पाहिजे व पुढील काळात येणारे संकट टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याचे पटवून दिले पाहिजे‘ असे मत व्यक्त केले.  यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरण मोहिमेत स्वेरी डिप्लोमाच्या १५ ते १८ वर्षे वयोगटातील तब्बल १९१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन लसीचा पहिला डोस घेतला. यात विद्यार्थीनींची संख्या देखील लक्षणीय होती.  नियोजित वेळेत दुसरा डोस देखील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने देणार असल्याचे यावेळी  सांगण्यात आले. लसीकरण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा.पी.एस. वलटे यांनी काम पहिले तर ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्व विभागप्रमुखप्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here