स्वेरीच्या रोहन पवारला कुस्तीत गोल्ड मेडल पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर- इंदापूर (ता. बारामती, जि-पुणे) मधील क्रीडा संकुल मध्ये ‘ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन’ तर्फे आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये स्वेरीच्या रोहन पांडुरंग पवार याने प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवत गोल्ड मेडल पटकावले आहे. यामुळे आता त्यांना पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रवेश मिळणार आहे. यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत असून रोहन पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

           रहाटेवाडी (ता.मंगळवेढा) येथील रोहन पांडुरंग पवार यांनी दहावीनंतर स्वेरीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात प्रवेश घेतला. पुढे वसतिगृहातील व्यायाम शाळेमुळे त्यांनी व्यायामात सातत्य राखले. कॉलेजमध्ये देखील त्यांनी कुस्तीचा सराव सुरूच ठेवला. दरम्यान वाखरी येथे दि. ३ ऑगस्ट रोजी एमआयटी महाविद्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यामुळे त्यांना दि. २१ ऑगस्ट रोजी इंदापुरमध्ये ‘ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन’ तर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील आणि ५५ किलो वजन गटातील कुस्ती स्पर्धेमध्ये देखील गोल्ड मेडल मिळाले. अंतिम सामन्यात रोहन पवार यांनी अटीतटीच्या सामन्यात विशाल ताड ला आस्मान दाखवले. ‘आता या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विजेता झाल्यामुळे रोहन पवार हे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत कुस्ती खेळण्यासाठी पात्र झाले आहेत. त्यामुळे आंध्रप्रदेशात होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना जाता येणार आहे.’ अशी माहिती प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांनी दिली. रोहन यांना बालपणापासून कुस्तीची आवड होती. त्यामुळे त्यांनी कोल्हापूर मध्ये पेठ वडगाव येथे कुस्तीचा सराव सुरु केला.या कुस्तीसाठी त्यांना क्रीडा मार्गदर्शक किरण देठे, कोल्हापुरचे वस्ताद आनंद पाटील व राकेश जोजारे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. स्वेरी मध्ये अभ्यासासोबतच विविध क्रीडा प्रकारांनाही प्रोत्साहन दिले जाते.  त्यासाठी नाईट मॅचेस च्या दृष्टीने फ्लड लाईट सह  आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट ग्राउंड स्वेरीच्या कॅम्पस मध्ये होऊ घातले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली रोहन पवारने हे यश मिळवले. कुस्तीत यश मिळाल्यामुळे कोच किरण देठे व रोहन पवार यांचा डॉ.बी.पी. रोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी रोहन यांच्या मातोश्री सौ.वनिता, वडील पांडुरंग पवार आणि मामा बाळासाहेब बाबर, प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ व प्रा. अजिंक्य देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. रोहन पवार यांना कुस्तीत गोल्ड मेडल मिळाल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here