सुशिलकुमार शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सुशिलकुमार शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांचा उपक्रम

सोलापूर // प्रतिनिधी 

देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्यावतीने अनोख्या पध्दतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे 25 बाय 45 फुटाची भव्य रांगोळीतून शिंदे साहेब दिल्ली येथील लाल किल्ल्यावर भाषण करत असल्याची प्रतिकृती साकारण्यात आली. या रांगोळीचे उद्‌घाटन माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, सोलापूर मनपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, शहराध्यक्ष बाबा करगुळे, गणेश डोंगरे, सागर राठोड, शैलेश पाटील, गणेश सुतार, सौदागर जाधव, समीर कोळी, अमर सुर्यवंशी, सागर कदम यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.
नितीन नागणे हे सुशीलकुमार शिंदे साहेबांचे कट्टरसमर्थक म्हणून ओळखले जातात. यंदा शिंदे साहेबांचा 80 वा वाढदिवस असल्याने त्यांना अनोखी रांगोळी साकारून शुभेच्छा दिल्या आहेत त्यामुळे त्यांचे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून कौतुक केले जात आहे.

चौकट
सोलापूरकरांचे ते स्वप्न लवकरच पूर्ण होवो
सोलापूरचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी कर्तृत्व व पक्षनिष्ठेच्या जोरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ते केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. आता येणाऱ्या काळात साहेब देशाचे पंतप्रधान व्हावेत अशा शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here