सांगोला विधानसभा मतदार संघातील भाळवणी विभागात रस्ते दुरुस्तीसाठी रू.७१ लाख मंजूर.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
सांगोला-पंढरपूर विधानसभा मतदार संघातील भाळवणी विभाग व जिल्हा परिषद गटातील प्र.रा.मा.१५ ते भंडीशेगाव शेळवे रस्ता मध्ये सुधारणा करणे रु. १० लाख, भंडीशेगाव ते शेळवे रस्ता मध्ये सुधारणा करणे रु.१० लाख, भाळवणी गवळी वस्ती-धोंडेवाडी रस्ता मध्ये सुधारणा करणे रू.८ लाख, भाळवणी चव्हाण वस्ती गार्डी रस्ता मध्ये सुधारणा करणे रु.८ लाख, धोंडेवाडी ते वाघाडवाडी रस्ता मध्ये सुधारणा करणे रु.१० लाख, जैनवाडी ते मिरजे गोफने वस्ती मार्गे गार्डी रस्ता मध्ये सुधारणा करणे रु९.५लाख, तिसंगी-हलदहिवडी रस्ता मध्ये सुधारणा करणे रु.९.५ लाख, भंडीशेगाव ते वाघाड वस्ती मध्ये सुद्धा सुधारणा करणे रु.६.७५ लाख असा एकूण  जवळपास ७१ लाखांचा निधी जिल्हा नियोजन समिती मार्फत मंजूर झाल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. शोभाताई तानाजी वाघमोडे- देशमुख यांनी दिली.
सदर निधी हा ग्रामीण रस्ते दुरुस्तीसाठी मंजूर झालेला असून त्याकरिता प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामास सुरुवात होईल. सदरची कामे मंजूर करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा.श्री. प्रशांतराव परिचारक साहेब व सांगोल्याचे आमदार ॲड. मा. श्री शहाजी बापू पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झाल्याचेही यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ.शोभाताई तानाजी वाघमोडे-देशमुख व जिल्हा परिषद सदस्य सौ.सविता निखिलगिर गोसावी व पंचायत समिती सदस्य मा.श्री.संभाजीराजे शिंदे यांनी  सांगितले
सदर रस्ते दुरुस्ती कामासाठी निधी मिळावा म्हणून या भागातील नागरिक व कार्यकर्ते वारंवार पाठपुरावा करीत होते गेल्या अनेक वर्षापासून सदर रस्त्यांची दुरुस्ती झाली नसल्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता याची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा. श्री. प्रशांतराव परिचारक साहेब व सांगोल्याचे आमदार मा. श्री शहाजीबापू पाटील साहेब यांनी प्रयत्न करून वरील निधी मिळवून दिला आहे. सदर कामी पालकमंत्री मा. श्री.दत्तात्रय मामा भरणे यांचेही सहकार्य लाभल्याचे यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ.शोभाताई तानाजी वाघमोडे-देशमुख यांनी सांगितले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here