सरस्वती विद्यालय व कर्मविर भीमराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालय “क्रिडा सप्ताहाला” सुरवात!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सरस्वती विद्यालय व कर्मविर भीमराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालय “क्रिडा सप्ताहाला” सुरवात!

सरस्वती विद्यालय व कर्मविर भीमराव महाडीक कनिष्ठ महाविद्यालय टाकळी सिकंदर मध्ये दि- 27 डिसेंबर 2023 बुधवार रोजी पासून संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मा.कै.पै.भिमराव ( दादा ) महाडीक यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि संकुलाचे आधारस्तंभ,आमचे आधारवड संसदरत्न खासदार मा.श्री धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त संकुलाचे मार्गदर्शक व भिमा सहकारी साखर कारखान्याचे कार्यतत्पर चेअरमन मा श्री विश्वराज (भैय्या ) महाडीक व संकुलाचे उपाध्यक्ष मा.श्री सुधीर ( आबा ) भोसले यांच्या मार्गदर्शनखाली ” क्रिडा सप्ताहाला “सुरवात करण्यात आली.

स्पर्धेला सुरवात करण्यापूर्वी संकुलाचे संस्थापक मा.कै पै.भिमराव ( दादा ) महाडीक यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुखांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकुलाचे प्राचार्य श्री राजीव यादव तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्मयोगीप्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम मनिषा व्यवहारे या होत्या. आठवडाभर चालणारया या” क्रिडा सप्ताहा मध्ये “विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सांघीक खेळामध्ये कबड्डी, खो खो, तसेच व्हालीबाॅल मैदानी क्रिडा स्पर्धा या प्रकारात 100मी, 200 मी ,400 मी धावणे तसेच लांब उडी, उंच उडी व थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक अशा विविध क्रिडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

यावेळी संकुलाचे प्राचार्य.श्री राजीव यादव व प्रमुख पाहुण्या कर्मयोगी प्राथमिक विद्यालय टाकळी सिकंदर च्या मुख्याध्यापिका श्रीम मनिषा व्यवहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सर्व स्पर्धांचे नेटके नियोजन शारिरीक शिक्षण विभागचे प्रमुख श्री तानाजी जावळे ,श्री मंगेश मोरे व श्री बळवंत शिंदे यांनी केले उत्कृष्ट सहकार्य श्रीम विद्या चव्हाण व श्रीम नम्रता चव्हाण तसेच श्रीम सुवर्णासोनटक्के यांनी केले. सेवक श्री शंकर घाडगे व श्री राजेंद्र पवार यांनी मोलाची साथ दिली.

यावेळी संकुलाचे पर्यवेक्षक श्री अशोक जाधव,श्री रमेश जाधव, श्री प्रकाश हेगडे,श्री दिलीप डोंगरे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री परमेश्वर गायकवाड तसेच श्री बाळासाहेब कोळेकर, श्री तानाजी अनुसे,श्री रामचंद्र देशपांडे, उपस्थित होते.कार्यक्रमचे सुत्रसंचालन व आभार श्री बापूसाहेब बाबर यांनी केले.यावेळी संकुलातीलसर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here