श्री संत दामाजी कारखान्याचे गळीत हंगाम २०२२-२३ चे जादा उस बिल रु.५१/- प्रमाणे बँक खात्यावर जमा:श्री।शिवानंद पाटील- चेअरमन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री संत दामाजी कारखान्याचे गळीत हंगाम २०२२-२३ चे जादा उस बिल रु.५१/- प्रमाणे बँक खात्यावर जमा:श्री।शिवानंद पाटील- चेअरमन

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या मागील २०२२-२३ हंगामात ऊस पुरवठा केलेल्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील शेतकÅयांना जादा ऊसाचे बिल रु।५१/- प्र।मे।टन प्रमाणे यापुर्वीचे ऊस बील पाठविलेल्या बँकामध्ये वर्ग केले असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री।शिवानंद पाटील यांनी दिली। मागील सन २०२२-२३ हंगामातील एफआरपी रु।२२९६।४५ असुन हंगामात अखेरपर्यंत गळीतास आलेल्या संपुर्ण ऊसास रु।२३००/- प्रमाणे बील यापुर्वीच हंगाम बंद होताना दिले आहे। शेतकÅयांच्या कष्टाचा विचार करुन येणाÅया दिवाळी सणासाठी आणखीन रु।५१/- प्र्र।मे।टन प्रमाणे जास्तीचे बील दिले आहे। अशा प्रकारे रु।२३५१/- प्रमाणे ऊस बील देवून एफआरपी पेक्षा रु।५४।५५ जास्तीचे बील देण्याचे काम या संचालक मंडळाने केले आहे। तरी शेती विभागाच्या कर्मचाÅयांकडून बीलाचे व्हावचर घेवुन आपले पहिले बिल घेतलेल्या संबंधीत बँकेतुन ऊसाचे बीलाची रक्कम घ्यावी असे त्यांनी सांगीतले।

धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मंगळवेढा व धनश्री पतसंस्थेच्या सर्व शाखामध्ये, बँक आùफ इंडिया शाखा मंगळवेढा, जिजामाता महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था-मंगळवेढा, रतनचंद शहा सहकारी बँक, मंगळवेढा इत्यादी बँकां-पतसंस्थामध्ये सदरची रक्कम संबंधीत शेतकÅयांचे सोईनुसार वर्ग केल्याची माहिती प्र।कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली।

पुढे बोलताना चेअरमन श्री शिवानंद पाटील म्हणाले, गळीत हंगाम २०२३-२४ चालू झालेला असून या हंगामाकरिता ऊसाच्या वाढीसाठी पोषक असा पाऊस झाला नसल्याने ऊसाची वाढ योग्य प्रकारे झालेली नाही। त्यामुळे हा हंगाम आव्हानात्मक आहे। या गळीत हंगामामध्ये चार लाख मे।टन गाळपाचे उद्षि्ट संचालक मंडळाने ठेवलेले आहे। तसेच या हंगामामध्ये गळीतास येणा-या ऊसास इतर कारखान्याचे बरोबरीने ऊस दर देणार आहे। गळीताचे हे उद्षि्ट पूर्ण करणेसाठी सभासद- शेतक-यांनी आपला ऊस दामाजी कारखान्यासच गळीतास देवून ही संस्था भरभराटीस आणणेकामी योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। तालुक्यातील जेष्ठ नेतेमंडळी, कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री।तानाजीभाऊ खरात, संचालक मंडळ, तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक सभासद-शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्याने ठरविलेले चार लाख मे।टन गाळपाचे उद्दीष्ठ निश्चीतच पूर्ण करु असा विश्वास त्यांनी सदर प्रसंगी व्यक्त केला.

 

यावेळी कारखान्याचे व्हा।चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तु, गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, यांचेसह उŠस तोडणी वाहतुक ठेकेदार, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here