श्री संत दामाजी कारखान्यावर आ. समाधान आवताडे यांचे वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार मा।श्री।समाधानदादा आवताडे यांचा ४५ वा वाढदिवस कारखाना कार्यस्थळावर विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कारखाना साईटवर वृक्षारोपण करुन ऊस तोडणी व वाहतुकीचे काम करणा-या कारखान्यावर मुक्कामी असणा-या बैलगाडी मजुरांना थंडीपासुन बचावासाठी
ब्लँकेट,फराळ वाटप कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा।अंबादास कुलकर्णी यांचे शुभहस्ते  करण्यात आले
वाढदिवासाचे निमित्ताने व्हाईस चेअरमन मा।अंबादास कुलकर्णी व उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते  दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात करणेत आली। यावेळी कारखाना व्यवस्थापनाचे वतीने संचालक मा।श्री। सचिन शिवशरण कामगारांच्या वतीने श्री पंडीत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच शिक्षण मंडळ मंगळवेढे चे सदस्य दिगंबर यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करुन मा।आमदार श्री।समाधानदादा आवताडे यांना ४५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी कारखान्याचे संचालक मा।सुरेश भाकरे, राजीव बाबर, यांचेसह  भारत निकम, उद्योजक अविनाश मोरे, प्र।कार्यकारी संचालक रमेश गणेशकर, वर्क्स मॅनेजर गणपत घाडगे, मुख्य शेती अधिकारी रमेश पवार, कामगार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, कामगार पतसंस्थेचे चेअरमन विश्वास सावंजी, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजय पाटील, हेडटाईमकिपर आप्पा शिनगारे, ईडीपी मॅनेजर मनोज चेळेकर, बैलगाडी प्रमुख जगन्नाथ इंगळे, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे तसेच कामगार संघटना, पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील सभासद, शेतकरी, हितचिंतक, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, मजुर व सिझन कामाचे कंत्राटदार इत्यादी मोठया संख्येने उपस्थित होते।
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कार्यालय अधिक्षक दगडु फटे यांनी केले व सुत्र संचालन  प्रा।संतोष मिसाळ यांनी केले।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here