श्री पांडुरंग कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याज बँकेत वर्ग (ऐच्छीक ठेवीमुळे ठेवीदारांना अधिकचे उत्पन्न)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याजाची रक्कम कारखाना प्रत्येक वर्षी देत असतो. कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जमा असणाऱ्या सुमारे 12.68 कोटी ठेवीवर द.सा.द.शे.8% प्रमाणे र.रु.93.00 लाख ठेवीदाराच्या विविध बँकेमधील खात्यावर आज रोजी वर्ग करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी दिली योवळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.श्री.कैलासराव खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी सांगितले की, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासले असून सोलापूर जिल्हात सातत्याने सर्वाधिक ऊसदर दिलेला आहे. आदरणीय मोठया मालकांचा आदर्श घेवून कारखान्याच्या सभासदांना प्रत्येक वर्षी व्याज बिल दिले जात असून यावर्षीही ठेवीदारांना व्याज बील दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच ठेवीदारांनाही दिलासा मिळाला आहे.सध्या बँकाकडून ठेवीवर 5ते 6 टक्के इतके व्याज दिले जाते. परंतू पांडुरंग कारखान्याकडून बँकांच्या व्याजापेक्षाही ज्यादा म्हणजेच 8 टक्के इतका व्याजदर ठेवीदारांना दिला आहे. त्यामूळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त एच्छिक ठेवी कारखान्याकडे ठेवाव्यात म्हणजे त्यांना व्याजाचे रक्कमेतून चांगले उत्पन्न मिळेल.
कारखाना गळीत हंगाम 2022-23 मध्ये उच्चांकी गाळप क्षमतेने सुरु असून या हंगामात 12.00 लाख मे.टन ऊस गाळप करणेचे उदिष्ट कारखान्याने ठेवलेले आहे. या हंगामात पांडुरंग कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाचे प्रति टन रु.2400/- प्रमाणे पेमेंट केले असून एफ आर पी प्रमाणे संपुर्ण पेमेंट करणार आहोत. त्याचबरोबर तोडणी व वहातुक ठेकेदारांच्याही बिलाच्या रक्कमाही वेळेवर अदा करीत आहोत. कारखाना चालू गळीत हंगामात प्रतिदिन 7,500 मे.टन गाळप करीत असून कारखान्याचा डिस्टीलरी प्रकल्प वाढीव 90 के.एल.पी.डी. क्षमतेने व्यवस्थीतपणे सुरु आहे, को-जनरेशनही सुरळीत सुरु असून त्यामधूनही जास्तीत जास्त विज एक्स्पोर्ट करीत आहोत.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सागीतले की कारखान्याचा पुढील गाळप हंगाम 2023-24 हा वाढीव गाळप क्षमतेने चालविणेसाठीची प्रक्रिया सुरु झालेली आहे. चालू हंगाम बंद होताच त्याअनुषंगाने नुतनीकरणाचे काम जलदगतीने सुरु होऊन कारखान्याचा पुढील गळीत हंगाम सुरुवातीपासूनच वाढीव क्षमतेने चालणार आहे. चालू गळीत हंगाम मा.चेअरमन प्रशांतराव परिचारक (मालक) , व्हाईस चेअरमन मा.कैलास खूळे व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखाना इतिहासातील सर्वोच्च गाळप क्षमतेने सुरु आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री. दिनकरराव मोरे, श्री.वसंतराव देशमुख, श्री.उमेशराव परिचारक, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री.हरीष गायकवाड, श्री. ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री. बाळासो यलमर, श्री.भगवान चौगुले, श्री लक्ष्मण धनवडे, श्री.भास्कर कसगावडे, श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.सुदाम मोरे, श्री.विजय जाधव, श्री.हणमंत कदम, श्री.किसन सरवदे, श्री. शामराव साळुंखे, श्री.राणु पाटील, आदि उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here