श्रींच्या गर्भगृह संवर्धन कामांची पाहणी (काम वेळेत पूर्ण करण्याच्या अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या सक्त सूचना)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्रींच्या गर्भगृह संवर्धन कामांची पाहणी

(काम वेळेत पूर्ण करण्याच्या अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या सक्त सूचना)

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गर्भगृहाचे संवर्धन करण्याचे काम सुरू असून, सदर ठिकाणच्या कामांची मंदीर समितीच्या सर्व सदस्यांनी पाहणी केली. यावेळी संबधित ठेकेदाराने नेमून दिलेल्या वेळेत दर्जेदार काम करावे. तसेच पुरातत्व विभागाने व संबंधित ठेकेदाराने यासाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळ वाढवावे अशा सूचना सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिल्या.

तदनंतर आराखड्यातील कामासंदर्भात सह अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 9.30 वाजता मंदिर कार्यालयात सभा संपन्न झाली. या सभेस सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, दूरदृष्यप्रणालीद्वारे डॉ. दिनेशकुमार कदम, ह.भ.प.भास्करगिरी महाराज, भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे गुरुजी, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख बलभीम पावले, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे व कामाचे ठेकेदार उपस्थित होते.

या वेळी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा गाभारा तसेच सोळखांबी येथील सर्व लाकडी दरवाजांना देणगीदारांमार्फत चांदी लावणे. तसेच विठ्ठल सभा मंडप येथील संवर्धनाचे काम आषाढी यात्रे पूर्वी पूर्ण करणे. याशिवाय, दर्शन रांगेतील कायमस्वरूपी उभारण्यात आलेल्या 4 पत्राशेडचे नूतनीकरण करणे, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे विद्युत व्यवस्थेसाठी सोलर पॅनल बसवणे इत्यादी निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here