विठ्ठलच्या प्रत्येक सभासदाला न्याय मिळवुन देणार:-अभिजीत (आबा) पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उपरीचे सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह पळशी, सुपली, वाडीकुरोली, मगरवाडी येथील शेतकरी सभासदांनी अभिजीत पाटील गटात केला जाहीर प्रवेश

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूकीचे बिगुल वाजल्यापासून संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.सत्ताधारी गटाच्या कुचकामी कारभारामुळे विठ्ठलचे यंदा धुराडेही पेटू शकले नाही तर दुसरीकडे अभिजीत पाटील यांनी अवघ्या ३५ दिवसांत बंद अवस्थेत असणारा सांगोला सहकारी साखर कारखाना सुरू करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.सांगोल्यासह इतर तीन साखर कारखाने त्यांनी यशस्वीपणे चालवून दाखवले आहेत.अशातच त्यांनी विठ्ठलच्या निवडणूकीत उडी घेतल्याने सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांची मत मतांतरे जाणून घेण्यासाठी अभिजीत पाटील यांनी विचार विनिमय बैठकांचे आयोजन सुरू केले आहे.

सत्ताधारी गटाच्या उदासीन धोरणाला कंटाळून व अनेकांची ऊस बिले थकीत राहिल्याने अनेक शेतकऱ्यांनी अभिजीत पाटील यांची सक्षम पर्याय म्हणून निवड केली आहे. काल कारखान्यासंदर्भात उपरी येथे झालेल्या विचार विनिमय बैठकीत अनेक शेतकरी व नेत्यांनी अभिजीत पाटील गटात प्रवेश केला आहे. तुंगत,पटवर्धन कुरोली,सरकोली या गटानंतर काल उपरीच्या बैठकीला शेतकरी सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अभिजीत पाटील यावेळी म्हणाले, ‘कारखान्याची लढाई ही विचारांची लढाई आहे. ती विकासाने बोलली पाहिजे. वैयक्तिक टीकाटिप्पणी करून सभासदांची मने जिंकण्याचा कुणी प्रयत्न करून नये. विकासाचे धोरण मी सभासदांपुढे मांडत आहे. सभासदांचा कल माझ्याकडे आहे. सभासदांनी उपरी या गावामध्ये दिलेल्या प्रतिसादामधून विजयाचा हा कल मला स्पष्ट दिसत आहे. कारखान्यात फक्त शेतकरी सभासद, कामगार हितालाच प्राधान्य असेल. कारखाना सुरू झाल्यावर पहिला हफ्ता हा २५०० रुपयांचा असेल असेही आश्वासन त्यांनी दिले.

या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश केला आहे.उपरीच्या सभेत उपरीचे सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पाटील गटात केला जाहीर प्रवेश केला. मगरवाडी येथील मा. ग्रा.प सदस्य जालिंदर नकाते,हनमंत जगदाळे, युवा नेते हनुमंत हिंगे तसेच सुपली येथील शिवाजी सोपान माळी, मोहन माळी, सुखदेव विठोबा यलमार, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाळासाहेब लाडे,मा.उपसरपंच शिवाजी ज्ञानोबा यलमार,मा.सरपंच भारत दामू लाडे, अरुण घाटूळे,दिपक यलमार,सुरेश दशरथ घाटूळे,कांतीलाल रामहारि यलमार,अनिल यलमार, शामराव यलमार, आनंदा माळी, मा सरपंच, औदुंबर सुदाम लाडे,अनिल यलमार, दीपक यलमार,वाडीकुरोली येथील संजय नामदेव काळे, तावशी ग्रा. सदस्य शिवाजी कृष्णात शिंदे, धोंडेवाडी येथील रघुनाथ धर्मा देठे, उमेश देठे, चेअरमन सुनील ताठे यांनी अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश केल्याने अभिजीत पाटील गटाची ताकद वाढलेली दिसत आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाला मोठे खिंडार पडले असून येत्या निवडणूक याची किंमत सत्ताधारी गटाला मोजावी लागू शकते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here