लिंगराज शेंडगे यांची भाजपा सोलापूर पुर्व युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

लिंगराज शेंडगे यांची भाजपा सोलापूर पुर्व युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड!

(भारतीय जनता युवा मोर्चाचे संघटन सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामिण भागात पोहचविणार:-लिंगराज शेंडगे)

पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील मा.लिंगराज प्रभाकर शेंडगे यांची भारतीय जनता पार्टी सोलापूर पूर्व युवा मोर्चाच्या उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ही निवड राज्यसभा खासदारमाननीय श्री धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांच्या नेतृत्वाखाली व भीमा सहकारी साखर कारखान्यांचे विद्यमान चेअरमन,विश्वराज (भैय्या) महाडिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

या निवडीचे पत्र सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिनदादा कल्याणशेट्टी , युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव व मोहोळ भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष सुनीलदादा चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

या निवडीनंतर राज्यसभा खासदारमाननीय श्री धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक ,भीमा सहकारी साखर कारखान्यांचे विद्यमान चेअरमन,विश्वराज (भैय्या) महाडिक यांनी लिंगराज शेंडगे यांचे अभिनंदन केले.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्र विकासाचे धोरण,व केंद्र शासनाच्या योजना,सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी सोलापूर पूर्व युवा मोर्चा लिंगराज शेंडगे यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here